HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 11:58 AM2017-04-14T11:58:36+5:302017-04-14T17:28:36+5:30

वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल.

HEALTH: Follow these 'habits' to prevent heat loss! | HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

HEALTH : ​उष्माघात टाळण्यासाठी ‘या’ सवयी पाळा !

Next
ong>-Ravindra More
उन्हाचा तडाखा वाढतच असून आरोग्याकडे लक्ष देणे खूपच गरजेचे आहे. जर वेळीच लक्ष दिले नाही नाही ऊन लागणे, उष्माघात यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यासाठी खाण्या-पिण्याच्या काही सवयींचे पालन करणे फायदेशीर ठरेल. 

* कोणत्या सवयींचे पालन कराल?
* सकाळी पाणी पिणे
सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर डिटॉक्स होईल शिवाय पचनही चांगले होते. दिवसभरातही भरपूर पाणी पिल्यास उन्हाचा त्रास जाणवणार नाही. 

* व्यायाम करणे 
सकाळी व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होते. 

* नाश्ता करणे
सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. दिवसाची सुरूवात पौष्टिक नाश्त्याने केल्यास संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जाईल. 

* गोड खाणे टाळा
जास्त गोड खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. गोड पदार्थ कमी प्रमाणात खा. 

* बाहेरील शीतपेय टाळा
उन्हाचा दाह कमी करण्यासाठी बाजारातील शीतपेयांऐवजी घरगुती सरबत, पन्हे प्या. यामुळे शरीर थंड राहील. 

* फळे व भाज्यांचा वापर करा
 फळे व भाज्या खाल्ल्याने पोट साफ होऊन पचन सुधारते. उन्हाळ्यात टरबूज, लिंबू, कैरी अशा फळांमुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. 

* पुरेशी झोप घ्या
 रोज सहा ते आठ तासांची पुरेशी झोप घेतल्याने दिवसभर फ्रे श वाटते शिवाय झोप बरोबर झाली तरच काम करण्याचा उत्साह वाढतो. 

ALSO READ : HEALTH : उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी !

Web Title: HEALTH: Follow these 'habits' to prevent heat loss!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.