HEALTH : उन्हाळ्यात पांढरे कपडे देतील गारवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 10:54 AM2017-03-19T10:54:17+5:302017-03-19T16:24:17+5:30
पांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तीत करतो म्हणून उन्हाचा दाह कमी होऊन शरीराला गारवा मिळतो. शिवाय शुभ्र पांढरा रंग शांततेचे प्रतिक समजला जातो आणि हा असा एक रंग आहे जो प्रत्येक बॉडी टाईपला आणि रंगाला शोभतो.
Next
पांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तीत करतो म्हणून उन्हाचा दाह कमी होऊन शरीराला गारवा मिळतो. शिवाय शुभ्र पांढरा रंग शांततेचे प्रतिक समजला जातो आणि हा असा एक रंग आहे जो प्रत्येक बॉडी टाईपला आणि रंगाला शोभतो. उत्साही आणि सुंदर दिसण्यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचे कपडे वापरले जातात.
* बऱ्याचदा आपल्याला पार्टीचे आमंत्रण येते. त्याठिकाणी आकर्षक दिसण्यासाठी कोणते कपडे वापरावे या विचारातच आपण संभ्रमात पडतो. मात्र स्वत:ला मॅच्युअर आणि आकर्षक दाखविण्यासाठी आपण पांढरा रंग वापरु शकता. त्यावर ठराविक ज्वेलरी व्यक्तिमत्वाला चांगला लूक प्रदान करते.
* कुणाला भेटण्यासाठी जात असाल तर डेनिमवर पांढरा शर्टही अतिशय छान दिसतो. शर्टाच्या बाह्या फोल्ड करुन त्यावर कुठल्याही फिकट रंगाची ट्राउजर शोभून दिसते.
* पांढऱ्या रंगाचा ड्रेसही प्रत्येक स्त्रीवर उठून दिसतो. त्यावर आॅक्साईड ज्वेलरी अतिशय छान दिसते.
* आॅफिस लुकसाठीही पांढरा कलर उत्तम आहे, पांढऱ्या फॉर्मल शर्टवर निळी जीन्स अथवा स्कर्ट आणि मोत्याचे लहान कानातले ही तर उत्कृष्ट रंगसंगती आहे.
* फक्त पांढराच रंग नाही तर त्याऐवजी व्हाईटक्रिम, एगशेल, आईवरी, नवाजोव्हाई आणि वॅनिला हे कलरही पांढऱ्या रंगाला पर्याय म्हणून वापरता येऊ शकतात.