HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 09:06 AM2017-02-15T09:06:36+5:302017-02-15T14:38:12+5:30

वॉशिंग्टन विद्यापीठात केलेल्या संशोधनात एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट हे पॉलिफेनॉल गटातील संयुग ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून आले असून हे संयुग अस्थिमज्जेशी संबंधीत मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांसाठी गुणकारी आहे.

HEALTH: Green tea is 'beneficial' on 'bone marrow'! | HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी !

HEALTH : ​‘अस्थिमज्जा’वर ग्रीन टी आहे गुणकारी !

Next
शिंग्टन विद्यापीठात केलेल्या संशोधनात एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट हे पॉलिफेनॉल गटातील संयुग ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून आले असून हे संयुग अस्थिमज्जेशी संबंधीत मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांसाठी गुणकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जॅन बिशके यांनी असे म्हटले आहे की, लाइट चेन अमायलॉइडोसिस या रोगात शरीराच्या एका भागातील प्रतिपिंड विविध अवयवांमध्ये पसरतात, त्यात हृदय व मूत्रपिंडाचा समावेश असतो. यात लाइट चेन अमायलॉइडोसिसचा उलगडा आवश्यक होता व त्यावर ग्रीन टीमधील संयुग कसे काम करते हे समजते. लाइट चेन अमायलॉइडोसिस अस्थिमज्जा रोगाच्या रुग्णांमधून वेगळे काढले गेले. व नंतर त्यावर ग्रीन टीमधील संयुगाचे वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट या संयुगाचा परिणाम पार्किन्सन व अल्झायमर या रोगांमध्ये तपासण्यात आला. त्यात दोन्ही रोगांत साचत जाणाऱ्या घातक प्रथिनांना हे संयुग अटकाव करते. असे दिसून आले. लाइट चेन अमायलॉइडोसिसची पुनरावृत्ती व त्यांचे साचत जाणे यात थांबवले जाते.

Also Read : ​​ग्रीन टीचा प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम

Web Title: HEALTH: Green tea is 'beneficial' on 'bone marrow'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.