Health : रोज एक-दिड तास प्रवास करणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 11:45 AM2017-05-27T11:45:29+5:302017-05-27T17:15:29+5:30
आपणही ऑफिसला येण्या-जाण्यासाठी प्रवास करीत असल्यास ‘हे’ नक्की वाचा
Next
आज प्रत्येकाचे आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यातच नोकरीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या अगणित आहे. एका संशोधनातुन असे आढळले की, जर आपण रोज एक -दिड तास कामानिमित्त प्रवास करीत असाल तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
रॉयल सोसायटी आॅफ पब्लिक हेल्थ रिपोर्टने हा अहवाल सादर केला असून त्यात पुढे म्हटले आहे की, प्रवास करताना बहुसंख्य लोक आपला वेळ बस, ट्रेन आणि कारमध्ये घालवतात. याचा विपरित परिणाम आरोग्यावर होत असल्याचे नमुद केले आहे.
भारतीयांच्या तुलनेने इंग्लंड मधील लोक प्रवासादरम्यान विशेष काळजी घेताना दिसतात. ते लांबचा प्रवास करताना सुमारे 800 कॅलरीचे पदार्थ सोबत ठेवतात आणि प्रवासादरम्यान खातात. मात्र ही गोष्ट भारतीयांमध्ये दिसत नाही, असेही या संशोधनात आढळले आहे.
लांबच्या प्रवासामुळे ताण-तणाव तर वाढतोच शिवाय फिजिकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. अशावेळी बीएमआय आणि ब्लड प्रेशरमध्ये वाढ होते. एवढच नव्हे, तर अधिक वेळ प्रवासात गेल्यास, आरोग्यासाठी उपयुक्त संतुलित आहारापासून आपण वंचित राहतो. तसेच झोपही पूर्ण होत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो.
या अभ्यासात असेही आढळले आहे की, ४४ टक्के लोक प्रवासादरम्यान तणावात असतात. कारण ते आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्र परिवाराला वेळ देऊ शकत नाहीत. त्याचवेळी ४१ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी करतात. तर काही लोकांची झोप पूर्ण होत नाही, तर काहीजण प्रवासादरम्यान जंकफूड खूप खातात. एकत्रित या सर्व गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो.
Also Read : HEALTH : प्रवासात मळमळ/ओकारी होतेय? या समस्येवर "हे" आहेत प्रभावी उपाय !