Health : घरीच करु शकता एचआयव्हीची चाचणी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 09:16 AM2017-04-11T09:16:04+5:302017-04-11T14:46:04+5:30

आपणास रुग्णालयात जाऊन HIV टेस्ट करण्यास भीती वाटत आहे का? मग घरीच करा ही तपासणी.

Health: HIV can be tested at home! | Health : घरीच करु शकता एचआयव्हीची चाचणी !

Health : घरीच करु शकता एचआयव्हीची चाचणी !

googlenewsNext
ong>-Ravindra More 
जर आपल्या मनात एचआयव्हीग्रस्त असण्याचा संशय येत असेल किंवा आपणास एचआयव्हीग्रस्तांची लक्षणे स्वत:च्या शरीरात जाणवत असतील तर आपण घरच्या घरी ओराक्विक टेस्टद्वारे एचआयव्ही चाचणी करू शकता.
या किटद्वारे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही टेस्ट करु शकता. हे स्टिक हिरड्यांमध्ये ठेवून मालिश केल्याने व्यक्ती एचआयव्हीग्रस्त आहे की नाही हे जाणून घेता येते. 
ओराक्विक ही एचआयव्ही टेस्ट करण्याची किट आहे. ही किट प्रेगनन्सी किटप्रमाणे दिसते. याचा आकारही प्रेगनन्सी टेस्ट मशीनप्रमाणे आहे. यामुळे त्वरित परीक्षण करता येते. 

कसे कार्य करते हे मशीन ?
* ओर क्विक टेस्ट हिरड्यांमध्ये लावले जाते. 
* वरच्या व खालच्या भागातील हिरड्यांची मालिश करून योग्य प्रकारे हे हिरड्यांमध्ये लावतात. 
* या किटमुळे २० मिनिटात परिणाम कळतो. 
* जर टेस्ट स्टीकवर सी लिहून आले तर तुम्हाला एचआयव्ही नाही. 
* जर टेस्ट किटवर टी लिहिले असेल तर टेस्ट करण्यात आलेली व्यक्ती एचआयव्ही पॉजिटिव्ह आहे. 

परिणाम ९० टक्के खात्रीदायक 
अनेकांना या किटच्या परिणामांवर संशय येतो. परंतु ही किट बनवणाºया कंपनीने दावा केला आहे की ९० टक्के परिणाम खरे येतात. या किटला अमेरिकी अन्न व औषध विभागाची मान्यता मिळाली आहे. या किटची किंमत ६० डॉलर म्हणजेच जवळपास ३,८०० रुपये आहे.

Web Title: Health: HIV can be tested at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.