​HEALTH : डासांपासून मुक्ततेसाठी करा घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 02:45 PM2017-03-23T14:45:58+5:302017-03-23T20:23:06+5:30

डासामुळे डेंग्यू, मलेरिया, टायफाईड आदी आजार उद्भवू शकतात. मात्र आपण घरगुती उपाय करुन कीडे-मुंग्या किंवा डास आदींना घालवू शकता.

HEALTH: Home remedies for getting rid of mosquitoes! | ​HEALTH : डासांपासून मुक्ततेसाठी करा घरगुती उपाय !

​HEALTH : डासांपासून मुक्ततेसाठी करा घरगुती उपाय !

googlenewsNext
ोग्याच्या दृष्टिने आपण घरात कितीही स्वच्छता ठेवली, तरी परिसरातील घाणीमुळे तयार झालेले डास आपल्या घरात येऊ शकतात. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन डेंग्यू, मलेरिया, टायफाईड आदी आजार उद्भवू शकतात. मात्र आपण घरगुती उपाय करुन कीडे-मुंग्या किंवा डास आदींना घालवू शकता.

काय उपाय कराल?
घरात माशांचा प्रादूर्भाव भरपुर प्रमाणात असेल तर संत्र्याची साल उघडल्यावर ठेवा. शिवाय स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. तसेच माशा व दुगंर्धीला दूर ठेवण्यासाठी बंद डस्टबिन वापरा. घरातील डास पळवून लावण्यासाठी तुळस, कडूनिंब घराशेजारी लावा. ज्या कारणांनी डासांची उत्पत्ती होते अशा वस्तू घराशेजारी ठेवू नका. त्यात गडद रंगाचे कापड, परफ्यूम व हेअर स्प्रे या गोष्टींमुळे डास आकर्षित होतात. परिसरात डासांचे प्रमाण जास्त असल्यास नारळाच्या काथ्या जाळा. यामुळे डास निघून जातात. 

कापूर जाळल्यानेही डास पळून जातात. कापरातील सल्फरमुळे किटकांना दूर ठेवण्यास मदत होते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल व अँटीफंगल तत्व आढळतात. घरात रोज कापूर जाळा. गडद रंगाच्या उघड्या भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात कापराच्या वड्या टाका. हे पाणी असेच उघडे राहू द्या. यामुळे घरातील डास बाहेर पडण्यास मदत होते. 

Web Title: HEALTH: Home remedies for getting rid of mosquitoes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.