HEALTH : डोकेदुखीवर लगेच आराम देता हा घरगुती बाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 06:57 AM2017-03-31T06:57:07+5:302017-03-31T12:27:07+5:30

डोकेदुखीवर आपण लगेच घातक पेनकिलर घेता का? थांबा, तयार करा घरगुती बाम आणि मिळवा त्वरित आराम...

HEALTH: Home remedies at headache soon! | HEALTH : डोकेदुखीवर लगेच आराम देता हा घरगुती बाम!

HEALTH : डोकेदुखीवर लगेच आराम देता हा घरगुती बाम!

Next
ong>-Ravindra More
सध्याची आपली जीवनशैली, ताणतणाव, आॅफिसातील कामाचा व्याप आदी कारणाने डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत प्रत्येकालाच ही समस्या सतावत आहे. बरेच लोक तर डोकेदुखी जास्तवेळ सहन करु शकत नाही, आणि त्वरित पेनकिलर घेतात. मात्र काहीही विचार न करता डोकेदुखीवर पेनकिलर घेणे हे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे, हे आपणास माहित आहे का? 
पेनकिलरच्या वापराने त्वरित डोकेदुखी थांबते, मात्र याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. दुखणे दाबण्यासाठी या औषधांमध्ये एस्टेरॉएडचा वापर होतो आणि भविष्यात याचे कित्येक साइड इफेक्ट्स होऊ शकतात. यासाठी पेनकिलरपेक्षा घरगुती उपायांनी डोकेदुखी थांबविणे कधीही चांगले.
आज आम्ही आपणास असा बाम बनविणे शिकविणार आहोत, ज्याच्या वापराने काही वेळातच तुमची डोकेदुखी जरी मायग्रेन असेल तरी लगेच थांबेल.  

घरगुती बाम बनविण्यासाठी साहित्य सामग्री
मेण- ३ चमचा,
नारळ तेल- ३ चमचा,
शिया बटर- ३ चमचा,
पेपरमिंट आॅइल- २० थेंब
लव्हेंडर आॅइल- १५ थेंब

बाम तयार करण्याची पद्धत
घरगुती बाम तयार करण्यासाठी मेण, नारळ तेल आणि शिया बटरला एका भांड्यात घ्या. आता याला मायक्रोव्हेवमध्ये ४५ सेकंदापर्यंत एका मिनिटापर्यंत गरम करा. जेव्हा ते मिश्रण पूर्णत: वितळून जाईल तेव्हा त्याला बाहेर काढून थंड करण्यासाठी ठेवा. जेव्हा ते भांडे थंड होईल तेव्हा त्यात एक-एक करुन सर्व तेल मिक्स करा. आता या मिश्रणाला एका बाटलीत भरा आणि थंड होऊ द्या. आपण याला घट्ट होण्यासाठी काहीवेळ फ्रिजमध्येही ठेवू शकता. जेव्हाही डोकेदुखी असेल तेव्हा आपण आपल्या डोक्याला लावू शकता. याला लावल्याने काही वेळातच आपणास त्वरित आराम मिळेल.   

Web Title: HEALTH: Home remedies at headache soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.