HEALTH : ​घरगुती उपायाने सोडा 'धुम्रपान', फक्त ५ मिनिटात दिसेल परिणाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2017 07:21 AM2017-04-27T07:21:22+5:302017-04-27T12:51:22+5:30

आपणही खिशात 'कॅन्सर' बाळगताय का? चला मिटवा हि सवय अगदी सोप्या उपायांनी...!

HEALTH: Home remedies 'smoking' will appear in just 5 minutes! | HEALTH : ​घरगुती उपायाने सोडा 'धुम्रपान', फक्त ५ मिनिटात दिसेल परिणाम !

HEALTH : ​घरगुती उपायाने सोडा 'धुम्रपान', फक्त ५ मिनिटात दिसेल परिणाम !

googlenewsNext
ong>-Ravindra More
सिगारेटचे पाकिट आणि चित्रपटात दाखविण्यात आलेली जाहीरात, ‘धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे..’ हे पाहून आपणास वाटत असेल की, आपण धुम्रपानास कायमचे सोडायचे. मात्र खरच आपण तसे करु शकतो का? आजपर्यंत आपण धुम्रपान सोडण्याचा बऱ्याचदा विचार केला असेल, मात्र हा विचार काही दिवसानंतर तुमच्या मनातून गायब होतो. यासाठी आज आम्ही आपणास आयुर्वेदिक पद्धतीने धुम्रपान कसे सोडावे याविषयी काही टिप्स देत आहोत. या टिप्स फॉलो केल्यास याचा परिणाम केवळ पाच मिनिटात दिसू लागेल. 

Image result for adrak

* अद्रक 
अद्रकाचे लहान-लहान तुकडे करुन त्यात थोडे काळे मीठ आणि थोडा लिंबूचा रस मिक्स करुन मिश्रण तयार करा. हे मिश्रण काही वेळ उन्हात ठेऊन कोरडे करा. कोरडे झालेले हे मिश्रण आपल्या खिशात नेहमी ठेवा. जेव्हा सिगारेटची आठवण येईल तेव्हा हे मिश्रण थोड्या प्रमाणात तोंडात ठेवा. अद्रकातील सल्फर सिगारेट किंवा अन्य मादक पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवते. हा उपाय केल्यास याचा परिणाम आपणास फक्त पाच मिनिटात दिसेल.

Image result for amla

* आवळा
अद्रक प्रमाणेच आवळादेखील धुम्रपानाच्या सवयीला दूर ठेवण्यास मदत करतो. यासाठी आवळ्यांच्या तुकड्यांना मीठाच्या पाण्यात मिक्स करु न उन्हात कोरडे करा. धुम्रपानाची इच्छा जाणवल्यास हे तुकडे तोंडात घेऊन चघडा. यातील विटॅमिन ‘सी’ मुळे निकोटीन घेण्याची इच्छा मरते.  

Image result for red chili

* लाल मिरची
लाल मिरचीमध्ये कॅप्साइसिनशिवाय विटॅमिन ‘सी’देखील असते, जे श्वसन प्रणालीला सुदृढ आणि धुम्रपानाच्या इच्छेला कमी करते. लाल मिरचीचा वापर मसाल्याबरोबरच १ ग्लास पाण्यात चिमुटभर मिक्स करून घेऊ शकता. याचा परिणाम नक्की जाणवेल. 

Image result for honey

* मध
धुम्रपानच नव्हे तर कोणत्याही प्रकारची नशा दूर करण्यासाठी मध खूपच उपयुक्त आहे. मधामध्ये विटॅमिन, एन्जाइम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे धुम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते. यासाठी नेहमी शुद्ध मधाचा वापर करा. याचा परिणाम लवकर दिसू लागतो.  

Image result for mulethi

* जेष्ठमध
आपल्या शर्टाच्या पाकिटात सिगारेटऐवजी जेष्ठमध ठेवा. जेव्हाही धुम्रपान करण्याची इच्छा जागृत होईल तेव्हा जेष्ठमधाला तोंडात टाका. यामुळे आपली धुम्रपानाची इच्छा कमी होईल आणि याने आपले पोटदेखील चांगले राहील.  
  
Also Read : ​ALERT : आपण धुम्रपान करताय! तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

Web Title: HEALTH: Home remedies 'smoking' will appear in just 5 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.