HEALTH : ​तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 01:06 PM2017-02-26T13:06:14+5:302017-02-26T18:36:14+5:30

एखादा पदार्थ खाल्ल्याने किंवा ब्रश न केल्याने तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी बाहेरील माउथ फ्रेशनर न वापरता घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी घालविता येऊ शकते.

HEALTH: Household remedies for stomach disorders! | HEALTH : ​तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी घरगुती उपाय !

HEALTH : ​तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी घरगुती उपाय !

googlenewsNext
ादा पदार्थ खाल्ल्याने किंवा ब्रश न केल्याने तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी बाहेरील माउथ फ्रेशनर न वापरता घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी घालविता येऊ शकते. 



बडीशोप 
आपण अन्नाचे पचन व्हावे म्हणून जेवल्यावर बडीशोप खातो. पण हे एक उत्तम माउथ फ्रेशनरही आहे. बडीशोप लाळेची निर्मिती वाढवून दुर्गंधी निर्माण करणाºया किटाणूंचा नाश करते. बडीशोप खाल्याने पित्त आणि ढेकर यांचे प्रमाणही कमी होते. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी बडीशोप खाणे केव्हाही चांगले.



पुदिना
पुदिना हा प्रमुख घटक असलेले अनेक माउथ फ्रेशनर बाजारात उपलब्ध आहेत. विविध पदार्थांच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारी पुदिन्याची पाने त्यांच्या तीव्र सुगंध आणि थंडाव्यामुळे काही क्षणातच तोंडाची दुर्गंधी नाहीशी करतात. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी पुदिन्याची 2-3 पाने खावीत किंवा त्यापासून बनवलेला चहा प्यावा.



पार्सली
पार्सली आपण खाद्यपदार्थांच्या सजावटीसाठी वापरतो. पार्सलीमध्ये जीवाणूंचा नाश करणारे क्लोरोफिल असल्यामुळे जेवणानंतर पार्सली खावे. हे सर्वात उत्तम माउथ फ्रेशनर आहे. काही माउथ फ्रेशनर, साबण आणि परफ्यूममध्ये सुगंधासाठी पार्सलीचे तेल घालतात.



लवंग
सुवास आणि स्वादामुळे लवंगाचा स्वयंपाकात उपयोग केला जातो. फार पुर्वीपासून दातदुखीसाठी, टूथपेस्टमध्ये व माउथवॉशमध्ये लवंगाचा उपयोग केला जातो. एखादी लवंग तोंडात ठेवणे हा तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.



दालचिनी
 दालचिनीमध्ये जंतूनाशक घटक असून ती तोंडाला येणारी दुर्गंधी कमी करण्यास मदत करते. तुम्ही दालचिनीच्या काही काड्या चावू शकता किंवा चहामध्ये घालू शकता. दालचिनीच्या 5-6 काड्या पाण्यात घालून ते उकळावे. थंड झाल्यावर या पाण्याचा उपयोग माउथवॉश म्हणून होऊ शकतो.



वेलची
 वेलचीचे दाणे सुगंधी व स्वादिष्ट असल्याने तोंडाला दुर्गंधी येत नाही. एखादी वेलची चघळल्यास काही मिनिटांतच तोंडाला येणारी दुर्गंधी नाहीशी होते. जेवल्यानंतरही तुम्ही वेलचीचा चहा पिऊ शकता.



लिंबूवर्गीय फळे 
संत्री, लिंबू यांसारखी फळे लाळेची निर्मिती वाढवतात. प्लाकपासून तयार झालेले अ‍ॅसिड निष्क्रिय करून तोंडातील डेड सेल्स आणि अन्नाचे कण नाहीसे करते.

Web Title: HEALTH: Household remedies for stomach disorders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.