Health : फिट राहण्यासाठी प्रत्येक दिवशी किती कॅलरीज आवश्यक आहेत !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2017 11:08 AM2017-07-04T11:08:00+5:302017-07-04T16:38:00+5:30
जिवंत राहण्यासाठी आपणास ऊर्जेची आवश्यकता असते. जी आपणास कॅलरीजच्या रुपात आहाराच्या माध्यमातून मिळते. वजनानुसार आणि वयानुसार किती कॅलरीजची आवश्यकता असते, हे जाणून घ्या.
आरोग्यम् धन संपदा, असे म्हटले जाते. यासाठीच बरेचजण आपण फिट राहावे, आपले आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यात सेलेब्रिटींचा विचार केला तर फिट राहणे तर त्यांना अति आवश्यक असते. रात्रंदिवस शुटिंग, धावपळ, कामाचा व्याप आदींसाठी त्यांना नेहमी तत्पर राहावे लागते. यासाठी विशेषत: प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या शरीरासाठी पुरेशा प्रमाणात कॅलरीजचे सेवन करीत असतात.
* फिट राहण्यासाठी प्रत्येक दिवशी किती कॅलरी घ्याल?
आपणास दिवसभरातून किती कॅलरीज वापरायच्या आहेत, हे चार गोष्टींवर अवलंबुन आहे.
१) आपले वजन,
२) आपले वय
३) आपली क्रियाशिलता
४) आपले लिंग (महिला/पुरुष)
जिवंत राहण्यासाठी आपणास ऊर्जेची आवश्यकता असते. जी आपणास कॅलरीजच्या रुपात आहाराच्या माध्यमातून मिळते. जर आपण दिवसभर झोपून जरी राहिलो तरी शरीरातील सर्व प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. यालाच आपण आधारभुत चयापचयी प्रमाण (बीएमआर) असे म्हण्तो.
बीएमआर कॅलरीचे असे प्रमाण आहे जे मुलभूत शारीरिक कार्य जसे श्वास घेणे, पचन क्रिया आदी चालविण्यासाठी आवश्यक असते. कोणत्याही व्यक्तिला प्रत्येक दिवशी कमीत कमी एवढ्या कॅलरीज आवश्यक असतात. बीएमआर प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. मात्र पुरुषांसाठी सरासरी १६०० ते १८०० कॅलरी आणि महिलांसाठी १३०० ते १५०० कॅलरीज प्रत्येक दिवशी आवश्यक असतात.
खाली दिलेल्या चार्टद्वारे आपणास समजू शकते की, आपल्या वजनानुसार आणि वयानुसार किती कॅलरीज आवश्यक आहेत.
* महिलांसाठी
Weight | Age 18 to 35 | Age 36 to 55 | Age over 55 |
45 kg | 1760 cals | 1570 cals | 1430 cals |
50 kg | 1860 | 1660 | 1500 |
55 kg | 1950 | 1760 | 1550 |
60 kg | 2050 | 1860 | 1600 |
65 kg | 2150 | 1960 | 1630 |
70 kg | 2250 | 2050 | 1660 |
75 kg – (and above) | 2400 | 2150 | 1720 |
* पुरुषांसाठी
Weight | Age 18 to 35 | Age 36 to 55 | Age over 55 |
60 kg | 2480 | 2300 | 1900 |
65 kg | 2620 | 2400 | 2000 |
70 kg | 2760 | 2480 | 2100 |
75 kg | 2900 | 2560 | 2200 |
80 kg | 3050 | 2670 | 2300 |
85 kg | 3200 | 2760 | 2400 |
90 kg (and above) | 3500 | 3000 | 2600 |
Also Read : Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !