HEALTH : शरीरात वेदना होताहेत, तर वेदनाशामकाऐवजी वापरा घरगुती पर्याय !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2017 11:18 AM2017-02-01T11:18:26+5:302017-02-01T16:50:05+5:30
वेदनाशामकामुळे लगेचच आराम मिळतो हे जरी खरे आहे, मात्र याचा शरीरावर साईडइफेक्टही होतो. अशावेळी आपण दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी प्राकृतिक पर्यायदेखील वापरु शकता.
शरीरात जेव्हाही काही वेदना झाल्या तेव्हा आपण वेदनाशामक औषधे घेण्याची लगेच घाई करतो. होणाऱ्या वेदनांपासून लगेच आराम मिळण्यासाठी आपण हा पर्याय अवलंबितो. वेदनाशामकामुळे लगेचच आराम मिळतो हे जरी खरे आहे, मात्र याचा शरीरावर साईडइफेक्टही होतो. अशावेळी आपण दुखण्यापासून आराम मिळविण्यासाठी प्राकृतिक पर्यायदेखील वापरु शकता.
प्राकृतिक पर्याय शरीरावर लवकर आणि चांगला परिणाम करतात. प्राकृतिक पयार्यांमध्ये खानपानाचे काही विशेष नियम देण्यात आले आहेत. आपल्या खानपानात बदल केल्यास आपण दुखण्यापासून मुक्त होऊ शकता. सध्या डब्बाबंद खाद्यपदार्थांचा उपयोग जास्त होत आहे, त्यामुळे आपण पोषणापासून चारहात लांब जात आहोत. यासाठी असे खाणे अगोदर बंद करा. सोबतच खाली दिलेले उपाय अवलंबिल्यास होणाऱ्या वेदनांपासून दूर राहू शकता.
* मांसपेशीत वेदना
- सांधे आणि मांसपेशींच्या दुखण्यावर अद्रकाचा खूप चांगला उपचार आहे. यात जिंजरोल नावाचे रसायन असते जे दुखणे दूर करणाºया हार्मोन्सना स्त्रावित करते आणि आपल्या मांसपेशींना मदत करते. त्यामुळे त्यांचा ताण कमी होऊन दुखणे कमी होते.
* दातदुखी
- दाताचे दुखणे आणि हिरड्यांसंबधी आजारांवर लवंगाचा प्रयोग प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. लवंग दातदुखीवर खूपच उपयुक्त आहे. यातील यूजेनोल नावाच्या पदार्थामुळे दुखणे थांबते.
* छातीत जळजळ होणे
- छातीत जळजळ होत असेल तर सफरचंद खा. यात मॅलिक आणि टारट्रिक आम्ल असते, जे जेवणातील वसा आणि प्रोटीन्सला सहजतेने पचण्यास मदत करते. यामुळे पोट लवकर रिकामे होते आणि अतिरिक्त जेवणामुळे होणाºया जळजळीपासून आराम मिळतो.
* कानदुखी
- लसणाला तेलात जाळून कानात टाकल्यास कानाचे दुखणे थांबते. अगोदर लोक याचप्रकारचे प्राकृतिक उपचार करीत असत. लसूणमधील सल्फर आणि सेलेनियम दुखणे निर्माण करणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतात.
* डोकेदुखी
- एक वाटी चेरी रोज खाल्ल्याने डोकेदुखी थांबते. चेरीतील ‘एंथोसायनिन’ डोक्यातील नसांची सूज कमी करते, त्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
* पोटदुखी
- विविध प्रकारचे मासे खाल्ल्याने पोटातील आतड्यांची सूज कमी होते शिवाय पोटाच्या इतर तक्रारीही दूर होतात. यात उच्च प्रोटीन असते, जे पाचनतंत्रात खूप महत्त्वाची भूमिका निभाविते. अशावेळी आपण दहीदेखील खाऊ शकता.
* सांधेदुखी
- आॅर्थराईटिस सारख्या दुखण्यावर हळदीचा प्रयोग खूपच चांगला असतो. हळदीत कुर्कमिन असते, जे दुखण्यावर आराम देते. दूधात हळद मिक्स करुन घेतल्यास याचाही चांगला फायदा होतो.
* पायांत वेदना होणे
- पायांत दुखण्याने बरेचजण त्रस्त असतात. अशावेळी कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पाय बुडविल्याने आराम मिळतो. मिठात जीवाणूरोधक गुण असतात, सोबतच सूजेवरदेखील खूप लाभदायक आहे.