Health : नैराश्याने त्रस्त असाल तर करा हा उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 01:49 PM2017-05-30T13:49:11+5:302017-05-30T19:19:11+5:30
एका नव्या संशोधनानुसार चिनी मार्शल आर्टमधील ‘ताय ची’ च्या नियमित वापराने नैराश्य आणि मानसिक आजार बऱ्यापैकी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
Next
आ धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकजण नैराश्याने त्रस्त असल्याचे दिसून येते. नैराश्य दूर व्हावे आणि आरोग्य सुदृढ राहावे यासाठी वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करुन त्यावर योग्य उपाय शोधले जातात. त्यातच एका नव्या संशोधनानुसार चिनी मार्शल आर्टमधील ‘ताय ची’ च्या नियमित वापराने नैराश्य आणि मानसिक आजार बऱ्यापैकी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हे संशोधन ‘क्लिनिकल सायकॅटरी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.
या संशोधनात कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार न घेणाऱ्या अमेरिकेतील चिनी नागरिकांसाठी संशोधकांनी १२ आठवड्यांचा ‘ताय ची’ या प्रकाराची माहिती देणारा आणि सरावाचा कार्यक्रम घेतला. यादरम्यान मानसिक उपचारांपेक्षाही ‘ताय ची’मुळे रुग्णाचे आरोग्य सुधारण्यास अधिक मदत होत असल्याचे दिसून आले.
या अभ्यासात सहभागी झालेल्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा यात समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेले सर्वच जणांना गंभीर मानसिक आजार होता. तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार सुरू नव्हते. तसेच काही जणांवर याआधी करण्यात आलेल्या मानसिक उपचारांचाही या कार्यक्रमात विचार करण्यात आला नव्हता. सहभागी झालेल्यांचे तीन गट करण्यात आले. त्यात मानसिक ताणतणावावर चर्चा करण्यात आली तसेच ‘ताय ची’चे मार्गदर्शन करण्यात आले. १२ आठवड्यांच्या कार्यक्रमानंतर सहभागी झालेल्यांचे मानसिक आरोग्य सुधारल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले.
याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात मानसिक आजार आणि नैराश्यावर ताय ची प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते. वैद्यकीय उपचारांप्रमाणेच हा उपक्रम परिणामकारक असल्याचे मॅसॅच्युएट्स रुग्णालयाचे अल्बर्ट येऊंग यांनी म्हटले आहे.
Also Read : World Health Day 2017 : डिप्रेशनशी लढताना "या" ५ गोष्टी कराच !