Health : आपण लाजिरवाणे तर होत नाही ना ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 12:15 PM2017-01-27T12:15:50+5:302017-01-27T17:45:50+5:30
बहुतांश पुरुषांना आरोग्यासंदर्भात अशा काही समस्या असतात, ज्यामुळे दुसऱ्यासमोर लाजिरवाणे व्हावे लागते.
Next
बहुतांश पुरुषांना आरोग्यासंदर्भात अशा काही समस्या असतात, ज्यामुळे दुसऱ्यासमोर लाजिरवाणे व्हावे लागते. यातील बहुतेक समस्यांवर सहज उपाय मिळू शकतो. मात्र वेळेवर जर उपाययोजना केली नाही तर याच समस्या रौद्र रुप धारण करतात. आजच्या सदरात आपण अशा कोणत्या समस्या आहेत ज्यामुळे लाजिरवाणे व्हावे लागते आणि त्यावर काय उपाय आहेत याबाबत जाणून घेऊया.
*टक्कल पडणे-
कित्येक पुरुषांना तरुणपणातच टक्कल पडते. शरीरातील लोह, कॅल्शियम, प्रोटिन्स अशा न्युट्रिशन्सची कमतरता किंवा ताणतणाव वाढल्याने डोक्याचे केस गळतात व टक्कल पडते.
-काय कराल?
डायटमध्ये भाजीपाला, फळे, डेअरी प्रॉडक्ट्स, स्प्राऊट्स आणि दाळींचा समावेश करावा. यामुळे न्युट्रिशन्स मिळतील आणि रोज व्यायाम किंवा फिरायला जा. यामुळे ताणतणाव कमी होईल.
* जास्त केस-
शरीरातील एंड्रोजन हार्मोन्स बॅलन्स बिघडल्याने केसांची वाढ जास्त होते. यामुळे पुरुषांच्या पाठीवर आणि काही सेंसेटिव्ह भागावर केस वाढतात.
-काय कराल?
रेजर किंवा हेअर रिमुव्हिंग क्रीमचा वापर करु शकता. शिवाय लेजर ट्रिटमेंटने कायमस्वरुपी जास्त केसांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
* इनलार्ज प्रोस्टेट
वय वाढण्याबरोबरच इनलार्ज प्रोस्टेटची समस्या सतावू लागते. यामुळे सतत बाथरुमला जावे लागते.
-काय कराल?
युरिन रिलेटेड प्रॉब्लेम असल्याने लगेचच डॉक्टरांना भेटा. योग्य औषधोपचार केल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते.
* पोटाचा मोठा घेराव
पुरुषांचा टमी फॅट वेगाने वाढतो. अनहेल्दी आणि जास्त कॅलरीजचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने शिवाय अॅक्टिव न राहिल्याने पोटाचा घेर वाढतो.
-काय कराल?
रोज कमीत कमी ३० मिनिटे वेगाने चाला किंवा व्यायाम करा. तसेच जास्त गोड आणि तेलकट खाणे टाळा.
* श्वासाची दुर्गंधी
तोंडाच्या सफाईकडे लक्ष न दिल्याने बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. तसेच जास्त कांदे, लसूण खाल्ल्याने आणि मद्यपान, धुम्रपान केल्याने ही समस्या वाढते.
-काय कराल?
रोज किमान दोन वेळेस ब्रश करा. काहीही खाल्ल्यानंतर गुळणी करा तसेच खाल्ल्यानंतर बडीशेप किंवा इलायची खा.
* घोरण्याची समस्या
कित्येक पुरुषांना जोरजोराने घोरण्याची समस्या असते. झोपतेवेळी व्यवस्थित श्वास घेता येत नसल्याने ही समस्या उद्भवते.
-काय कराल?
रात्रीला झोपण्याअगोदर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. यामुळे घोरण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.
* घामाची दुर्गंधी
- कित्येक पुरुषांना घामाच्या दुर्गंधीची समस्या सतावते. शरीराची व्यवस्थित साफसफाईची काळजी न घेतल्याने ही समस्या जास्त बळावते.
-काय कराल?
पाण्यात थोडे मीठ किंवा फिटकरी टाकून आंघोळ करा. यामुळे बॅक्टेरिया नियंत्रणात राहतील आणि घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल