तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता? होऊ शकतात 'या' गंभीर समस्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 04:04 PM2024-09-02T16:04:50+5:302024-09-02T16:06:07+5:30

काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसानकारक असतं.

Health Impacts When You Sleep Next To Your Cellphone | तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता? होऊ शकतात 'या' गंभीर समस्या...

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता? होऊ शकतात 'या' गंभीर समस्या...

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसानकारक असतं. असं केल्याने काय काय  नुकसान होतात हे जाणून घेऊ.

मोबाईल फोनमधील रेडिएशन आरोग्यासाठी फार जास्त घातक असतात. मोबाईलमधून निघणारे रेडिएशन इरेक्टाइल डिसफंक्शनशी संबंधित आहेत. मोबाईल फोनमधून जो निळा प्रकाश निघतो. त्यामुळे झोप खराब होते आणि अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.

काय होतात समस्या?

मोबाईल फोनमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. जसे की, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना. वर्ल्ड हेल्थ ऑर्गयनायझेशननुसा, फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनने मेंदुवर गंभीर प्रभाव पडतो. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका देखील वाढतो. बरेच लोक असे आहेत ज्यांना मोबाईलमुळे डोकेदुखी, चिडचिडपणा आणि डोळ्यांमध्ये वेदना अशा समस्या होतात.

मोबाईल फोनमधून रेडिएशन निघतात. त्यामुळे प्रयत्न करा की, झोपताना फोन दूर ठेवावा. जर तुम्हाला फोनची सवय मोडायची असेल तर फोन सायलेंट करून दूर ठेवा. त्याऐवजी आवडीचं एखादं काम करा किंवा पुस्तक वाचा.

काही ठिकाणी मोबाईल टाळा

घरात काही ठिकाणं जसे की, जेवणाचा टेबल, झोपण्याची खोली, बाथरूम मोबाईल मुक्त ठेवा. असं केलं तर घरातील लहान मुले देखील या ठिकाणांवर फोन वापरणार नाही. 

डिजिटल डिटॉक्स

आठवड्यातील एक दिवस असा ठरवा ज्या दिवशी मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवायचा. याने मुलांचीही मोबाईलची सवय सुटेल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल. याने तुमचे संबंध मजबूत होतील. 

Web Title: Health Impacts When You Sleep Next To Your Cellphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.