HEALTH : फक्त १० मिनीटात असे वाढवा ‘ब्लड सर्कुलेशन’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2017 08:16 AM2017-04-24T08:16:30+5:302017-04-24T15:42:37+5:30

जसे वय वाढते तसी ही समस्या वाढण्यास सुरुवात होते. मात्र जर आपण आताच काळजी घेतली तर या समस्येपासून सुटका मिळू शकते.

HEALTH: Increase blood circulation in just 10 minutes! | HEALTH : फक्त १० मिनीटात असे वाढवा ‘ब्लड सर्कुलेशन’ !

HEALTH : फक्त १० मिनीटात असे वाढवा ‘ब्लड सर्कुलेशन’ !

googlenewsNext
ong>-Ravindra More
शरीरात ब्लड सर्कुलेशन म्हणजेच रक्त  संचारणाची प्रक्रिया बिघडण्याचे अनेक कारण आहेत. जर आपण योग्य प्रमाणात पाणी पित नसाल, जर आपण बेड कोलेस्ट्रॉलने त्रस्त असाल किंवा आपण व्यायामच करीत नसाल तर शरीराचे ब्लड सर्कुलेशन बिघडू शकते. उत्कृष्ट रक्त परिसंचरणाचा अर्थ म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहचणे होय. जसे वय वाढते तसी ही समस्या वाढण्यास सुरुवात होते. मात्र जर आपण आताच काळजी घेतली तर या समस्येपासून सुटका मिळू शकते. आम्ही आपणास याविषयी काही खास टिप्स देत आहोत.

* आपल्या शरीराची नेहमी हालचाल करावी. जसे की,  पायी  चालणे- फिरणे, १५ ते २० जागेवर उड्या मारणे. यामुळे आपल्या शरीरात त्वरित ब्लड सर्कुलेशन सक्रिय होईल. 

* जर आपण बसलेले असाल तर उभे राहा. त्यानंतर आपल्या शरीराला वरच्या दिशेने ओढा. पुन्हा आपल्या पायाच्या पंज्यावर उभे राहून सरळ उभे राहा. असे केल्याने आपले ब्लड सर्कुलेशन वाढण्यास मदत होईल. 

* आपल्या हातांना डोक्याच्या वर घ्या. आता हातांना गोल गोल फिरवा. अगोदर घड्याळीच्या दिशेने त्यानंतर घड्याळीच्या विरुद्ध दिशेने फिरवा. असे किमान १० वेळेस करा. 

* जमिनीवर सरळ बसा आणि आपल्या डोक्याला डाव्या आणि उजव्या बाजूला काही सेकंदांसाठी फिरवा. असे कमीतकमी १० वेळा करावे. 

* फिरायला जाणे हा उपाय रक्त संचारणाला उत्कृष्ट बनविण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. यामुळे आपल्या पायांच्या मांसपेशींचे वर्कआउटदेखील होते. 

* खाली बसून आपल्या पायांना वर उचला. आता पायांना घड्याळीच्या दिशेने त्यानंतर विरुद्ध दिशेने फिरवा. असे १० वेळेस करावे. 

* पोहणेदेखील ब्लड सर्कुलेशन वाढण्याचा चांगला पर्याय आहे. पोहल्याने सांध्यांवर जोरदेखील पडतो आणि शरीरात रक्ताचे प्रमाणही चांगले राहते. 

Web Title: HEALTH: Increase blood circulation in just 10 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.