HEALTH : फक्त एकच आसन करा आणि सर्व आजारांना दूर पळवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 10:39 AM2017-09-06T10:39:00+5:302017-09-06T16:09:00+5:30
जर आपणाजवळ योगाासन करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर योग निद्रा करुन आपल्या मनाला शांत करुन बऱ्याच आरोग्याच्या समस्या दूर पळवू शकतात.
Next
ब लत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्ती एखाद्या तरी आरोग्याच्या समस्याने त्रस्त आहे. बरेच लोक या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी सकस आहार आणि योग्य व्यायामप्रकार करीत असतात. सध्या लोक योगाच्या बाबतीतही जागृत झाले आहेत. बहुतेक सेलिब्रिटीदेखील स्वत:ला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी योगाचाच आधार घेतात. जर आपणाजवळ योगाासन करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर योग निद्रा करुन आपल्या मनाला शांत करुन बऱ्याच आरोग्याच्या समस्या दूर पळवू शकतात. योग मुद्रा एक ध्यान मुद्रा असून याला करण्याची पद्धतही खूप सोपी आहे.
* योग निद्रा करण्याची पद्धत
शांत वातावरणात जमीनीवर पाठीच्या बाजूने झोपावे. आपल्या दोन्ही पायांमध्ये किमान एका फुटाचे अंतर ठेवावे. आपल्या हातांना कमरेपासून सुमारे सहा इंच लांब ठेवावे. त्यानंतर डोळे बंद करुन शरीराला आराम द्यावा, ही प्रक्रिया ३० मिनिटांपर्यंत करावी.
* योग निद्राचे फायदे
* योग निद्रामुळे शरीर शांत होते आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.
* जर आपण डायबिटीजने त्रस्त असाल तर योग निद्रा आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरु शकते.
* बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांना आरोग्याच्या बऱ्याच समस्या उद्भवू शकतात, त्यात हार्ट अटॅक एक सामान्य आजार झाला आहे. यापासून वाचण्यासाठी योग निद्रा खूप चांगला उपाय आहे.
* धावपळीमुळे डोकेदुखीची समस्या नेहमी बऱ्याच लोकांना सतावत असते. या समस्येपासून वाचण्यासाठी योग निद्रा केल्यास आराम मिळू शकतो.
* अस्थमाने बरेच लोक त्रस्त असतात. जर आपणही या समस्येने त्रस्त असाल तर योग निद्रा अवश्य करावा.
* सिटिंग जॉबमुळे संपूर्ण दिवस मान खाली घालून काम करावे लागते. ज्यामुळे मानदुखीचा त्रास सुरु होऊन सर्वायकलची समस्या निर्माण होते. या समस्येवर उत्तम पर्याय म्हणजे योग निद्रा होय.
* कंबरदुखीची समस्या बहुतांश महिलांना सतावते. अशावेळी औषधांचा वापर करण्याऐवजी योग निद्राची मदत घ्यावी.
Also Read : Health : गरोदरपणात अवश्य करावित ही ‘५’ योगासने !
: International Yoga Day 2017 : ‘या’ अभिनेत्रींच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे योगा !