HEALTH : जाणून घ्या ताकाचे १५ फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 10:14 AM2017-02-28T10:14:43+5:302017-02-28T15:56:04+5:30
उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. अशा वेळेस सहज उपलब्ध होणारा आणि अतिशय आरोग्यदायी पदार्थ किंवा शीतपेय म्हणजे ताक.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात पाणीयुक्त घटक जास्त जाणे आवश्यक असते. यासाठी शरीराला गारवा मिळावा पाण्याचे प्रमाण समतोल राहावे म्हणून वेगवेगळे शीतपेय घेतले जातात. अशा वेळेस सहज उपलब्ध होणारा आणि अतिशय आरोग्यदायी पदार्थ किंवा शीतपेय म्हणजे ताक. ताक हे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
1. उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
2. वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो.
3. उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केल्याने फायदा होतो.
4. नियमीत ताकाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
5. सकाळ-संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
6. वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ मिसळून सेवन केल्याने फायदा होतो.
7. मळमळणे, उलटी येणे अशी लक्षणे असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.
8. सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेला लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
9. गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.
10. जर आपण अती ताण असलेल्या स्थितीत असाल तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णताही कमी होते.
11. शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच ताक लावल्याने फायदा होतो.
12. खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावावा. काही वेळाने स्नान करावे. खाजेपासून मुक्ती मिळेल.
13. विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो.
14. विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम मिळतो. तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य.
15. टाचा फाटल्यास ताक काढल्यानंतर निघणारं लोणी लावायला हवं.