HEALTH : यौन क्षमता कमी होते या सामान्य आजाराने !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 11:48 AM2017-02-02T11:48:50+5:302017-02-02T17:18:50+5:30

एका अभ्यासात लठ्ठपणामुळे स्टॅमिना कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात. यासाठी सेक्सदरम्यान ते अपेक्षित आनंद घेऊ शकत नाहीत आणि पार्टनरलाही संतुष्ट करु शकत नाहीत.

HEALTH: Lack of sexual ability or general illness! | HEALTH : यौन क्षमता कमी होते या सामान्य आजाराने !

HEALTH : यौन क्षमता कमी होते या सामान्य आजाराने !

Next
ong>-Ravindra More

लठ्ठपणा सध्या एक सामान्य आजार म्हणून उदयास येत आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमी असते शिवाय ते डिप्रेशनच्याही समस्येने त्रस्त असतात. विशेष म्हणजे या सर्वांचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवरही दिसून येतो. एका अभ्यासात लठ्ठपणामुळे स्टॅमिना कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात. यासाठी सेक्सदरम्यान ते अपेक्षित आनंद घेऊ शकत नाहीत आणि पार्टनरलाही संतुष्ट करु शकत नाहीत. या कारणाने ते आपल्या पार्टनरपासून दूर राहू लागतात.


हार्मोन्सच्या असंतुलनामुळे लठ्ठपणा वाढतो. सोबतच लठ्ठपणाचा संबंध सेक्स हॉर्मोनमुळे असतो. पुरुषात टेस्टोस्टेरोनच्या कमतरनेने सेक्ससंबंधी समस्या निर्माण होते. ज्या कारणाने त्यांच्यात सेक्सची इच्छा कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

बहुतांश मुली हेल्दी आणि फिट मुलांना डेट करणे पसंत करतात. या कारणाने लठ्ठ मुले एकटे राहू लागतात आणि डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त होतात. 
एका संशोधनानुसार, लठ्ठपणामुळे पुरुषात इंफर्टिलिटीची समस्या निर्माण होते. या संशोधनात लठ्ठ पुरुषात टेस्टोस्टेरोन नावाच्या सेक्स हार्मोनची सुमारे ५० टक्के कमतरता दिसून येते ज्याचे कारण इंफर्टिलिटी आहे.

लठ्ठपणामुळे बहुतांश पुरुष डायबिटीज, ह्रदयरोग आदी आजाराने त्रस्त होतात. या आजारासाठी जी औषधे घेतले जातात त्याचा सेक्स क्षमतेवर विपरित परिणाम होत असतो.

Web Title: HEALTH: Lack of sexual ability or general illness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.