​Health : चला, रागावर नियंत्रण मिळवूया !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 11:45 AM2017-04-29T11:45:06+5:302017-04-29T17:15:06+5:30

राग म्हणजे क्षणिक वेडेपणा असे म्हटले जाते. रागात आपण स्वत:वरचे नियंत्रण घालवतो आणि नको ते नुकसान करुन बसतो.

Health: Let's get rid of anger! | ​Health : चला, रागावर नियंत्रण मिळवूया !

​Health : चला, रागावर नियंत्रण मिळवूया !

googlenewsNext
ग म्हणजे क्षणिक वेडेपणा असे म्हटले जाते. रागात आपण स्वत:वरचे नियंत्रण घालवतो आणि नको ते नुकसान करुन बसतो. विशेषत: जर राग आॅफिसमध्ये आला तर आपल्या कामावर वाईट परिणाम होऊन आपल्यालाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत, ज्याच्या साह्याने आपण रागावर नियंत्रण मिळवू शकाल. 

* लांब श्वास घ्या
राग आल्यास थोडा लांब श्वास घ्यावा. कारण श्वासोच्छवासामुळे तुमची इंद्रिये शांत होतात. शिवाय तुमचे लक्ष श्वासाकडे वळवल्याने राग शांत होतो. रागावर नियंत्रण मिळविण्याची ही फार जुनी पद्धत असून आपणास नक्कीच लाभदायक ठरेल.  

* डोके शांत करा
राग आल्यास थोडे गप्प राहून त्वरित डोके शांत करा. रागाच्या भरात काहीही बोलू नका. काही वेळाने राग शांत झाल्यानंतर योग्य किंवा अयोग्य काय यातील फरक तुमच्या लक्षात येईल.

* रागात कोणताही निर्णय घेऊ नका
एकदा जर तुम्ही वेळ काढून इंद्रियांना आराम दिला, तर परिस्थिती समजून घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेणास मदत होईल. रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता टळेल. 

* शांतपणे बोला. गरज असल्यास माफी मागा
परिस्थितीचे योग्य मूल्यमापन केल्याने तुम्ही वादाच्या वेळी आपले म्हणणे शांत व सभ्यपणे मांडू शकता. महत्वाचे मुद्दे समजावून सांगा. उगाच दुसयºयांकडे बोट दाखवणे किंवा दोष देणे टाळा. 

या टिप्स फॉलो केल्यास आपला राग नक्की नियंत्रणात येईल शिवाय हळुहळु राग येण्याची सवयीही लुप्त होईल.  

Web Title: Health: Let's get rid of anger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.