झटपट वजन कमी करणं पडू शकतं महागात; होऊ शकतात या 5 समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 02:06 PM2019-05-02T14:06:18+5:302019-05-02T14:07:19+5:30

ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असतं, त्यांना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अशा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. खरं तर वजन कमी करणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं.

Health loss or problem due to quick weight loss | झटपट वजन कमी करणं पडू शकतं महागात; होऊ शकतात या 5 समस्या

झटपट वजन कमी करणं पडू शकतं महागात; होऊ शकतात या 5 समस्या

Next

ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असतं, त्यांना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अशा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. खरं तर वजन कमी करणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. एक्सरसाइज, डाएटिंग, तासन्तास जिममध्ये वर्कआउट करणं, योगाभ्यास आणि बाजारात मिळणाऱ्या वजन कमी करण्यासाठी असणाऱ्या औषधांचं वारेमाप सेवन यांसारख्या गोष्टी ते सतत करत असतात. परंतु, वजन काही कमी होत नाही. अशातच अनेक लोक निराश होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? लवकरात लवकर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवत आहात...

लवकर वजन कमी केल्याने शरीराला होणारे नुकसान :

डिहाइड्रेशन

वेटलॉस करण्याच्या प्रयत्नात जे डाएट फॉलो करण्यात येतं. त्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं. शरीरामधील पाण्याची पातळी कमी झाल्याने बद्धकोष्ट, डोकेदुखी, स्नायूंच्या समस्या आणि एनर्जी कमी होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याची कमतरता झाल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. तसेच त्वचा ड्राय होते. 

शरीरामध्ये न्यूट्रिशनची कमतरता

वजन कमी करण्यासाठी लोक नेहमी कॅलरी फ्री डाएटचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे शरीरामध्ये न्यूट्रिशन्सची कमतरता भासते. किटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेट नसतं. जे शरीराला एनर्जी देण्यासाठी मदत करतं. याच कारणामुळे ज्या लोकांच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटची कमतरता असते, त्यांना लगेच थकवा जाणवतो. अशा लोकांचा मूडही लगेच स्विंग होतो. तसच काही लोकांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते. 

मेंदूवर होतो विपरित परिणाम

वेट लॉसमुळे शरीरासोबत मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. डाएट बिघडल्याने आणि शरीरामध्ये न्यूट्रिशन्सची कमतरता झाल्याने अनेक प्रकारच्या मानसिक समस्या होऊ शकतात. 

बिघडू शकतं मेटाबॉलिज्म 

अनेकजण लठ्ठपणाने वैतगलेले असतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ते एवढे वैतागलेले असतात की ते विसरून जातात की, वजन कमी केल्याने मेटाबॉलिज्वर विपरित परिणाम होतो. डाएटमध्ये कॅलरीती कमतरता असल्याने मेटाबॉलिज्म निष्क्रिय होतं. मेटाबॉलिज्म व्यवस्थित काम करत नसल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं. 

(Image Credit : T Nation)

स्नायू कमजोर होतात

वजन कमी करण्यासाठी असलेल्या डाएटमध्ये अनेकदा स्नायू कमकुवत होतात. बराच वेळ डाएटचं सेवन स्नायूंसाठी ठिक नसतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

Web Title: Health loss or problem due to quick weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.