Health : निरोगी आरोग्यासाठी करा सूर्यनमस्कार !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2017 09:53 AM2017-05-28T09:53:48+5:302017-05-28T15:24:31+5:30

सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार असून रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते

Health: Make sun health for healthy health! | Health : निरोगी आरोग्यासाठी करा सूर्यनमस्कार !

Health : निरोगी आरोग्यासाठी करा सूर्यनमस्कार !

googlenewsNext
र्यनमस्कार हा १२ आसनांचा एक एकत्रित व्यायामप्रकार असून रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेस सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची प्रसन्न सुरुवात होते शिवाय शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास, विषारी घटक बाहेर टाकण्यास तसेच ताणतणाव कमी करण्यास मदत करतात. यामळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त सूर्यनमस्कार केल्याचे अनेक फायदे आहेत. त्यात शरीराचे स्वास्थ्य सुधारते, पचनशक्ती सुधारते, आकर्षक अ‍ॅब्स मिळण्यास मदत होते, शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते, मनाची अस्थिरता कमी होते, लवचिकता वाढते, मासिक पाळीचे चक्र सुधारते, चिरतरूण राहण्यास मदत होते, सौंदर्य सुधारण्यास मदत होते, वजन घटवण्यास मदत होते. त्यामुळे सूर्यनमस्कार आवर्जून करावा. 
सूर्यनमस्कार केल्याने अनेक फायदे असले तरी काही ठराविक व्यक्तींसाठी वर्ज्य केला आहे. त्यात गर्भवती स्त्रियांनी गर्भारपणातील पहिल्या तीन महिन्यांनंतर गर्भवती स्त्रीने सूर्यनमस्कार करणे टाळावे, हर्नियाग्रस्त किंवा उच्चरक्तदाबाची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करू नये, मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रिया तसेच मुलींनी सूर्यनमस्कार करु नये तसेच पाठदुखीची समस्या असलेल्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

Web Title: Health: Make sun health for healthy health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.