HEALTH : वजन वाढविण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 11:48 AM2017-05-19T11:48:46+5:302017-05-19T17:18:46+5:30

अनेकजणांची शरीरयष्टी कृश असते. काही केल्या त्यांचे वजन वाढत नाही. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरदेखील होतो.

HEALTH: To make weight increase the 'these' foods are included! | HEALTH : वजन वाढविण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश !

HEALTH : वजन वाढविण्यासाठी ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश !

Next
ेकजणांची शरीरयष्टी कृश असते. काही केल्या त्यांचे वजन वाढत नाही. याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरदेखील होतो. आज आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्या फॉलो केल्यास नक्की वजन वाढण्यास मदत होईल. 

वजन वाढविण्यासाठी आहार घेण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे. दिवसातून तीन वेळा संपूर्ण जेवण व अधून-मधून काहीतरी खायला हवे. आपल्या दिवसाची सुरुवात पोटभर नाश्त्याने करा. आहार विविध प्रकारचा असायला हवा. विशेषत: दर दोन ते तीन तासांनी काहीतरी खाल्ले पाहिजे. 

* दूध व मेवा
सकाळी सुका मेवा दुधात उकळून प्या. बदाम, खजूर व अंजीर यांच्यासोबत गरम दूध पिल्याने वेगाने वजन वाढते. दररोज किसमिस खाल्ल्याने वजन वाढते. दररोज आहारात ३० ग्रॅम किसमिसचा समावेश करा. 

* शेंगा
शाकाहारी लोकांसाठी शेंगा उत्तम पर्याय आहे. वाटीभर शेंगांमध्ये ३०० कॅलरी असतात. हा पौष्टिक आहार आहे. 

* केळी
वजन वाढवण्यासाठी केळी अगदी उत्तम उपाय आहेत. दिवसभरात तीन केळी खा. दूध व दह्यासोबत केळी खाल्ल्यास उत्तम. रोज सकाळी बनाना मिल्क शेक घ्या. महिन्याभरात फायदा होईल. 

* दूध व मध
मध वजन संतुलित राखते. वजन जास्त असल्यास कमी करण्याचे व कमी असल्यास वाढवण्याचे काम मध करते. दररोज नाश्त्याच्या वेळी व झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळून प्या. 

* पीनट बटर
यामध्ये असलेले मोनो अनसॅच्युरेटेड फॅट वजन वाढवण्यास मदत करतात. 

* खरबूज
हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. यामुळे वेगाने वजन वाढून डिहायड्रेशनपासून आराम मिळतो. 

Also Read : ​HEALTH ALERT : ​सकाळच्या ‘या’ सहा वाईट सवयींमुळे वाढते वजन !

Web Title: HEALTH: To make weight increase the 'these' foods are included!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.