HEALTH : ‘पुरुषत्वाचा’ हा आहे खास फॉर्मूला !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 07:47 AM2017-02-21T07:47:27+5:302017-02-21T13:27:17+5:30

आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसावे असे प्रत्येक पुरुषाला वाटते. त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नही करतो. मात्र बऱ्याचदा त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही.

HEALTH: 'Malevision' is a special formula! | HEALTH : ‘पुरुषत्वाचा’ हा आहे खास फॉर्मूला !

HEALTH : ‘पुरुषत्वाचा’ हा आहे खास फॉर्मूला !

Next
ong>-Ravindra More

आपले व्यक्तिमत्त्व रुबाबदार दिसावे असे प्रत्येक पुरुषाला वाटते. त्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्नही करतो. मात्र बऱ्याचदा त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. मात्र आज आम्ही आपणास पुरुषत्वाचे काही खास फॉर्मूले सांगणार आहोत जे आपण फॉलो केल्यास नक्कीच आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. 



चना (हरबरा) आणि गूळ खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र आहारतज्ज्ञांच्या मते, दोन्हीही जर एकत्र खाल्ले तर त्याचे आरोग्यासाठी फायदे अजून वाढतात. चना आणि गूळ एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर १० फायदे होत असल्याचे आहारतज्ज्ञांचे मत आहे. 

१) चना आणि गूळमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. 

२) चना आणि गूळमध्ये जिंक असल्याने चेहऱ्यावरची चमक वाढण्यास मदत होते. याच्या नियमित सेवनाने स्मार्टनेस वाढतो. 

३) चना आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीराचे मेटाबॉलिज्म वाढतो ज्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. 

४) चना आणि गूळ यामध्ये फायबर असल्याने याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि अ‍ॅसिडिटीचीही समस्या दूर होते. 

५) चना आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरातील विष (टॉक्सिन्स) बाहेर पडतात ज्याने पुरुषांची त्वचा उजाळते आणि लूकही बदलतो. 

६) यामध्ये ‘विटॅमिन बी६’ असल्याने मेंदूची क्षमता वाढते पर्यायी स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. 

७) यामध्ये फॉस्फरस असल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. 

८) यामध्ये पोटॅशियम असल्याने ह्रदयविकारासारख्या समस्यांपासून दूर ठेवते. 

९) यात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 

१०) यात अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, ट्रिफ्टोफेन आणि सेरेटोनिन हे घटक असतात, यामुळे ताणतणाव कमी होतो आणि डिप्रेशनची समस्या दूर राहण्यास मदत होते.

Also Read : ​ ​पुरुषत्व वाढवायचयं? तर ‘ही’ दाळ खा !

Web Title: HEALTH: 'Malevision' is a special formula!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.