HEALTH : मसाज करा अन् शारीरिक व मानसिक आनंद मिळवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2017 11:47 AM2017-02-03T11:47:44+5:302017-02-03T17:21:17+5:30
आपले आयुष्य सुखी आणि चांगले जगण्यासाठी आपणास समाधान, आनंद आणि स्वास्थ या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात आणि मसाज केल्याने या तिन्ही गोष्टी आपणास प्रदान होत असतात.
मसाजचे नाव ऐकूनच आपण विशेष अनुभवाच्या बाबतीत विचार करायला लागतो. खरं तर मसाजने आपणास खूपच आराम मिळत असतो. शिवाय आपल्या शरीरात एका नव्या ऊर्जेचा प्रवाह संचारतो. आजच्या सदरात मसाज केल्याने काय फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया.
काय आहेत मसाजचे फायदे
मसाज केल्याने मानसिक शांतताच नव्हे तर शारीरिक आरामदेखील खूप मिळतो. आपले आयुष्य सुखी आणि चांगले जगण्यासाठी आपणास समाधान, आनंद आणि स्वास्थ या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात आणि मसाज केल्याने या तिन्ही गोष्टी आपणास प्रदान होत असतात. वैद्यकीय शास्त्रानुसार मसाज केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होत असून यौन शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
* मसाज केल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
* मसाज केल्याने मांसपेशी, सांधेदुखी आदींपासून मुक्तता मिळते.
* रक्तदाब नियंत्रणात राहते.
* मसाज केल्याने एन्डॉर्फिन्स आणि डोपामाइन या दोन्ही हार्मोन्सचा स्त्राव वाढतो, यामुळे आपल्या शरीरातील कोणत्याही वेदनांपासून आराम मिळतो.
* डोपामाइन हार्मोन आपल्या मेंदूला आनंदाचा अनुभव देतो. मसाज केल्याने आपणास शांती मिळते. त्यामुळे मेंदू आणि ह्रदय आनंदीत होते. हीच क्रिया आपल्या मेंदूला आणि शरीरासाठी एक वेगळा अनुभव देत असते.
* मसाज केल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.
* कंबरदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळते.
* मन शांत होत असल्याने झोेपही चांगली लागते.
Also Read : स्टोन मसाज थेरपीने वेदनांना करा बाय बाय !