HEALTH : पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 02:08 PM2017-03-30T14:08:24+5:302017-03-30T19:38:24+5:30
हे दूध पुरुषांना उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करते. म्हणून जापान आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये पुरुषांच्या डायटमध्ये नेहमी या दुधाचा समावेश असतो.
Next
जापान आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये पुरुषांच्या डायटमध्ये नेहमी सोया मिल्कचा समावेश असतो. यात असे न्यूट्रिएंट्स असतात, जे विशेषत: पुरुषांना उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत करतात. मग जाणून घेऊया सोया मिल्कचे फायदे...
* सोया मिल्कमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. शिवाय स्किन सेल्सचे टिशूज मजबूत होतात, ज्यामुळे केस गळती थांबून टक्कल पडत नाही.
* यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे दिवसभर काम करुनही थकवा जाणवत नाही, स्टॅमिना वाढतो.
* या मिल्कमध्ये सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
* यात ओलेइक अॅसिड असते, ज्यामुळे रंग गोरा होण्यास मदत होते आणि आपण स्मार्ट दिसतो.
* सोया मिल्क कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे ह्रदयासंबंधीच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
* यात फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे आपण कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून दूर राहू शकतो.
* सोया मिल्कमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतो.
* यात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे जॉर्इंट पेन दूर राहण्यास मदत होते.