CoronaVirus News : नॅशनल वर्क फोर्सचा दणका; कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी 'या' औषधावर बंदी, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 12:48 PM2020-07-27T12:48:42+5:302020-07-27T13:05:57+5:30
CoronaVirus News & Latest Updates : दरम्यान काही दिवसांपूर्वी (Drug Controller General of India) डीसीजीआयने या औषधाच्या वापरासाठी परवागनी दिली होती.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या १४ लाखांच्याही पुढे गेली आहे. नव्या आकडेवारी प्रमाणे देशात आतापर्यंत तब्बल १४ लाख ११ हजार ९५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारात आता नॅशनल वर्क फोर्सने कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी इटोलिजुमाब या औषधाचा समावेश न करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी (Drug Controller General of India) डीसीजीआयने या औषधाच्या वापरासाठी परवागनी दिली होती. कोरोनाचं संक्रमण झालेल्या गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी आपातकालीन स्थितीत हे औषध वापरण्यासाठी परवागनी देण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाात औषधांची वाढती गरज लक्षात घेता रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी डिसीजीआयने रुग्णांच्या उपचारांसाठी इटोलिजुमाबला आपातकालिन स्थितीत वापरासाठी परवागनी दिली होती.
या औषधाचा उपयोग त्वचारोग सोरायसिसच्या उपचारांसाठी केला जातो. हे बायोकॉन कंपनीचे औषध आहे. कोविड 19 च्या श्वसनाची समस्या उद्भवत असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधाचा वापर करण्याची मंजूरी देण्यात आली होती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनसार या औषधाच्या प्रोटोकॉलच्या मुद्द्यावरून शुक्रवारी एका बैठकीत चर्चा झाली. या बैठकीतील अनेक तज्ज्ञांनी दिलेल्या मतानुसार कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी हे औषध कितपत योग्य ठरू शकतं याबाबत पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध २०१३ पासून प्लेक सोयारसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी एल्जुमाबी ब्रँण्ड इटोलिजुमाब हे औषध तयार करत आहे.
बायोकॉनच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावर नॅशनल वर्क फोर्सला या औषधाबाबात अजून काही पुराव्यांची आवश्यकता आहे. कोविड 19 च्या उपचारांसाठी प्रोटोकॉलमध्ये या औषधांचा समावेश करण्यासाठी आणखी माहिती प्राप्त केली जाणार आहे. देशभरात १०० पेक्षा रुग्णांवर या औषधाचा वापर केल्याने रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले होते. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. रेमडिसीवीर, डेक्सामेथासोन्स यांसह इतर औषधं कोरोना रुग्णांच्या उपचारात प्रभावी ठरत आहेत.
Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?
कोविड19 वर स्वस्त उपचार शोधण्यात हा देश सगळ्यात पुढे; चाचणीदरम्यान 'या' औषधानं केली कमाल