Health : ​दुधात साखर ऐवजी गूळ करा मिक्स, होणार सुदृढ !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 07:19 AM2017-05-18T07:19:55+5:302017-05-18T13:02:17+5:30

आपणही दुधात साखर मिक्स करुन पितात का? त्याऐवजी गूळ मिक्स करून प्या, होतील हे फायदे !

Health: Mix sugar instead of sugar, make mix, be healthy! | Health : ​दुधात साखर ऐवजी गूळ करा मिक्स, होणार सुदृढ !

Health : ​दुधात साखर ऐवजी गूळ करा मिक्स, होणार सुदृढ !

Next
ong>-Ravindra More
दूध आणि गूळदोन्हीही शरीरासाठी फायदेशीर आहेत, हे तर सर्वांनाच माहित आहे मात्र दुधात गूळ मिक्स करुन पिणे शरीरासाठी त्यापेक्षाही अधिक फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
सहसा बहुतेकजण दुधात साखर मिक्स करुन पितात, मात्र आज आम्ही आपणास दुधात गूळ मिक्स करुन पिण्याचे काय फायदे होतात याबाबत माहिती देत आहोत. 

* अनिद्रा पासून सुटका
जर आपण अनिद्रेच्या समस्येने त्रस्त असाल तर झोपण्याअगोदर एक ग्लास गरम दुधात गूळ मिक्स करुन सेवन करावे. यामुळे आपली अनिद्राची समस्या लवकर दूर होईल. गुळाचे सेवन केल्याने आपले रक्त शुद्ध होते आणि दूध आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करते. सोबतच आपल्या शरीरास रिलॅक्सदेखील करते. 

* पचनक्रिया सुधारते
पचनसंस्थेशी निगडित अनेक समस्यांवर दूध आणि गूळ खूप फायदेशीर आहे. दूध आणि गूळ मधील पोषक तत्त्व पोटात चांगल्या बॅक्टेरियांना वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे पचन व्यवस्थित होते. याच्या सेवनाने पचनक्रियेच्या सर्व समस्या दूर होतात आणि पोटात गॅसदेखील होत नाही.  

* कॅल्शियमचे प्रमाण भरपूर 
दूध आणि गूळ दोघात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यासाठी शरीरास सुदृढ बनविण्याबरोबरच हाडांचे आजार किंवा वयानुसार होणारी सांधेदुखीच्या त्रासापासूनदेखील सुटका मिळते. यासाठी रोज गुळाचा लहान तुकडा अद्रकसोबत सेवन करावे आणि गरम दूध प्यावे. असे केल्याने आपले सांधे मजबूत होतील आणि दुखणेही थांबेल. 

* मासिक पाळीतील वेदना होतील दूर
महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी गरम दुधात गूळ टाकून नक्की सेवन करावे. डॉक्टर्स नेहमी गरोदर महिलांना थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी गूळ सेवन करण्याचा सल्ला देतात. गरोदर महिलांनी रोज गुळाचे सेवन केल्यास त्यांना अ‍ॅनिमिया होत नाही. 
 
* वजन घटविण्यास मदत
जर आपण लठ्ठपणाने त्रस्त असाल तर यापासून सुटका मिळण्यासाठी दूध किंवा चहामध्ये साखरेऐवजी गूळ मिक्स करुन सेवन करावे. असे केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गूळमध्ये प्रोटीनच्या रुपात एनर्जी असते आणि दूध, चरबीला जाळण्यास मदत करते.

Also Read : HEALTH : पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का? 

source : navabharattimes 

Web Title: Health: Mix sugar instead of sugar, make mix, be healthy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.