चिंताजनक! पुन्हा लॉकडाऊन लागणार, मंकीपॉक्स ठरणार कारण?; WHO च्या एक्स्पर्टनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 03:00 PM2024-08-21T15:00:31+5:302024-08-21T15:01:09+5:30
मंकीपॉक्स हा आजार कोरोनासारखाच ठरू शकतो आणि त्यामुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी भीती जगभरात पसरली आहे. अ
आफ्रिकन देशांमध्ये झपाट्याने पसरत असलेला मंकीपॉक्स हा आजार कोरोनासारखाच ठरू शकतो आणि त्यामुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी भीती जगभरात पसरली आहे. अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) तज्ज्ञ डॉ. हांस क्लुजे यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. डॉ. हांस क्लुजे म्हणाले की, मंकीपॉक्स हा कोरोनासारखा नाही कारण अधिकाऱ्यांना रोगाचा प्रसार कसा रोखायचा हे माहित आहे.
मंकीपॉक्सच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होऊ शकतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले की, अशी कोणतीही शक्यता नाही. आफ्रिकेनंतर युरोपात काही प्रकरणे आल्यानंतर युरोपातील लोकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. MPOX चे नवीन व्हेरिएंट Clade Ib हा अतिशय धोकादायक असून या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका १० ते ११ टक्के आहे. हे पाहून जगभर भीतीचे वातावरण आहे.
विशेषत: युरोपमधील लोकांमध्ये, या विषयावर, डब्लूएचचे युरोपचे रीजनल डायरेक्टर डॉ. हांस क्लुजे म्हणाले की, व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबद्दल नक्कीच चिंता आहे, परंतु आपण एकत्र येऊन या रोगाचा संसर्ग थांबवू शकतो. अलिकडच्या काही महिन्यांत, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये mpox मुळे ४५० लोकांचा मृत्यू झाला आहे. स्वीडनमध्ये देखील एक प्रकरण नोंदवलं गेलं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आपल्याला नवीन व्हेरिएंटबद्दल बरंच काही माहित असणं आवश्यक आहे, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की हा रोग सहजपणे पसरतो आणि गंभीर होऊ शकतो.
मंकीपॉक्स ही ग्लोबल हेल्थ इमर्जेन्सी
या वर्षी एप्रिलमध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट सापडला होता. त्याची पहिली केस लंडनमध्ये २०२२ मध्ये नोंदवली गेली. काँगोमध्ये आतापर्यंत ४५० लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आजार इतका धोकादायक आहे की १० बाधित रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो. हा आजार आता काँगोच्या बाहेरही पसरू लागला आहे. त्यामुळे WHO ने नुकतंच याला ग्लोबल हेल्थ इमर्जेन्सी असं घोषित केलं आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं
मेयो क्लिनिकच्या मते, MPox संसर्गाचे परिणाम संसर्गाच्या ३ ते १७ दिवसांनंतर दिसू लागतात. संसर्गाचे परिणाम दिसू लागल्यानंतर, ताप, त्वचेवर पुरळ उठणे, व्हेरिकोज व्हेन्स, डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, सर्दी आणि थकवा यांसारखी लक्षणं रुग्णामध्ये दिसू लागतात. मंकीपॉक्समध्ये, त्वचेवरचे पुरळ प्रामुख्याने तोंड, हात आणि पाय याच्यावर आढळतात. जे लोक संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येतात त्यांना देखील मंकीपॉक्स होण्याचा धोका जास्त असतो.