एका दिवसात नेमकं किती मीठ खावं? WHO ने दिली महत्त्वाची माहिती, अशी घ्या आरोग्याची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:23 AM2021-12-29T08:23:34+5:302021-12-29T08:26:25+5:30

How Much Salt We Should Intake Daily : सोडियमच्या अतिसेवनामुळे जगभरात लाखो लोक रक्तदाबाचे बळी पडतात आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोकाही असतो.

health news how much salt we should intake daily know who recommendation | एका दिवसात नेमकं किती मीठ खावं? WHO ने दिली महत्त्वाची माहिती, अशी घ्या आरोग्याची काळजी

एका दिवसात नेमकं किती मीठ खावं? WHO ने दिली महत्त्वाची माहिती, अशी घ्या आरोग्याची काळजी

googlenewsNext

नवी दिल्ली - मीठामुळे अन्नपदार्थांना चव येते. त्यामुळे मीठ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दोन गोष्टींपासून मीठ तयार होतं, ते म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या (WHO) माहितीनुसार, आपण खातो त्या मिठामध्ये सोडियमचे (Sodium) प्रमाण बरेचदा जास्त असते तर पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण खूपच कमी असते. सोडियमच्या अतिसेवनामुळे जगभरात लाखो लोक रक्तदाबाचे (Blood pressure) बळी पडतात आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोकाही (Stroke) असतो.

डब्ल्यूएचओच्या मते, बहुतेक लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ वापरतात, ज्यामुळे जगभरात रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. WHO ने लोकांच्या आहारातून मीठ कमी करण्यासाठी एक कार्यक्रम ठरवला आहे. या अंतर्गत संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी 2025 पर्यंत मिठाचा वापर निम्मा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यास जगात दरवर्षी मीठामुळे होणारे 25 लाख मृत्यू कमी होऊ शकतात. WHO च्या मते, प्रौढ व्यक्तीने दररोज 4 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. 

रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका

हार्वर्ड मेडिकल जर्नलनुसार, सामान्य मिठामध्ये 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईड असते. आपल्याला यापैकी फक्त 500 मिलीग्राम सोडियमची आवश्यकता आहे. जास्त सोडियम आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यामुळे रक्तदाब, हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. यासोबतच हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडू लागते. अमेरिकेत लोक साधारणपणे 1.5 चमचे मीठ रोज खातात. त्यात सुमारे 3400 मिलीग्राम सोडियम असते. म्हणजेच गरजेपेक्षा 7 पट जास्त. आपल्या देशातील लोक अमेरिकन लोकांपेक्षा जास्त मीठ खातात.

दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक

डब्ल्यूएचओच्या मते, प्रौढ व्यक्तीने दररोज 2 ग्रॅमपेक्षा जास्त सोडियम खाऊ नये. याचा अर्थ असा की दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जरी यूएस आहार संदर्भाने देखील उच्च सेवन पातळी सेट केली नसली तरी, अन्नातून सोडियमची मर्यादा दररोज 1500 मिलीग्रॅम आहे. 2300 मिलीग्रॅमपेक्षा जास्त सोडियमचे सेवन धोकादायक मानले जाते. परंतु, या मर्यादेपेक्षा जास्त सोडियमचा वापर जगात सर्वत्र होत आहे. मीठाचा कमी वापर करून आरोग्याची काळजी घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: health news how much salt we should intake daily know who recommendation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.