रोजच्या 'या' ५ सवयींमुळे वेगानं वाढतंय वजन; साध्या चुकांमुळे राहत नाही फिगर मेंनेट, वेळीच माहीत करून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 02:51 PM2021-03-21T14:51:18+5:302021-03-21T15:49:33+5:30
सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिऊ नका. बहुतेक लोक रात्री पाणी न पिताच झोपतात. अशा परिस्थितीत सकाळपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता असते.
वजन कमी करण्यासाठी प्रत्येक लहान, मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. कारण तुम्ही कितीही व्यायाम केलात, कितीही डाएट केलं तरी तुमच्या रोजच्या लहान लहान सवयी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत. ज्यांचा तुमच्या वजन वाढण्याशी थेट संबंध असतो. जर तुम्ही या सवयींवर लक्ष केंद्रीत केलं तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकेल.
सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिऊ नका. बहुतेक लोक रात्री पाणी न पिताच झोपतात. अशा परिस्थितीत सकाळपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता असते. शरीराला पाण्याची खूपच गरज असते. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने आणि पाचन तंत्रावर त्याचा थेट परिणाम झाल्यामुळे शरीर डिडाड्रेट होते. यासाठी सकाळी उठून आधी लिंबू पाणी पिणे आवश्यक आहे. आपण प्रथम साधं पाणीही पिऊ शकता.
जर तुम्हाला न्याहारीमध्ये रस पिण्यास आवडत असेल तर पॅकेटचा रस अजिबात पिऊ नका. यामध्ये चरबी आणि साखर खूप जास्त आहे. न्याहरीच्या वेळी ताज्या फळांचा रस बनवण्याचा प्रयत्न करा आणि घरीच प्या. त्यात साखर घालू नका.
धावपळीत ब्रेकफास्ट अजिबात टाळू नका. कारण वेळेवर ब्रेकफास्ट घेतला नाही तर अन्न पचण्यास त्रास होतो. अन्न नेहमी चावून चावूनच खायला हवं. जेणेकरून त्यातील पूर्ण पोषक घटक आपल्याला मिळतील. बरेच लोक न्याहारी न करता घराबाहेर पडतात. असे केल्याने चयापचय कमी होतो. रात्रीच्या जेवणानंतर, सकाळच्या नाश्त्यापर्यंत एक लांब अंतर तयार होतो, ज्यामुळे पोट रिक्त असते. म्हणून पोटभर जेवण करायला हवं. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
न्याहारीमध्ये काहीतरी बनवू न शकल्यामुळे बरेच लोक जंक फूड किंवा फास्ट फूड खातात. असे करणे योग्य नाही. यामुळे पोटाची समस्या उद्भवू शकते. हे आपल्याला गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकवू शकते. म्हणून घरी तयार केलेल्या पदार्थांचा नाष्त्यासाठी समावेश करा. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू
आहारात अधिक कॅलरी घेतल्यामुळे लठ्ठपणा येतो. शक्य तितक्या कमी कॅलरी घेतल्या असतील तर चालणे, धावणे, सायकलिंगची मदत घेऊ शकता. सकाळी उठल्यावरही बराच काळ अंथरुणावर झोपणे ही एक वाईट सवय आहे. यामुळे शरीराची उर्जा कमी होते आणि दिवसभर आपल्याला त्रास होतो.