Health : या कारणाने उन्हाळ्यात येते नाकातून रक्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2017 10:17 AM2017-04-08T10:17:52+5:302017-04-08T15:47:52+5:30

अचानक नाकातून रक्त येते आणि त्यामुळे रक्ताने माखलेले कपडे पाहून बराच गोंधळ देखील उडतो.

Health: This occurs due to summer blood from the nose! | Health : या कारणाने उन्हाळ्यात येते नाकातून रक्त !

Health : या कारणाने उन्हाळ्यात येते नाकातून रक्त !

Next
्याचजणांना उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या सतावते. अचानक नाकातून रक्त येते आणि त्यामुळे रक्ताने माखलेले कपडे पाहून बराच गोंधळ देखील उडतो. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे रक्त आल्यावर दुखत देखील नाही आणि दुसरं म्हणजे नाकातून येणारं रक्त प्रत्येक वेळी आरोग्यासाठी घातक असतेच असे नाही. त्यामुळे घाबरून नये. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक या दोहोंनीही शांत रहावे.
नाकातून रक्त येण्यावर घरच्या घरी उपचार करता येणे शक्य आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाकातून रक्त येण्याच्या समस्येचे प्रमाण जास्त असते. नाकाच्या अगदी बाहेरच्या भागात एक नस असते. ही नस फुटली किंवा पडल्यामुळे तिच्यावर आघात झाला तर नाकातून रक्त येते. नाकातून होणाºया रक्तस्रावासोबतच काही वेळा कान आणि तोंडातूनही रक्त येऊ शकते.
नाकातून रक्त येण्याची अनेक कारणं आहेत. त्यातले काही कारणं म्हणजे कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, अँस्पिरिनसारख्या औषधांचा जादा वापर, लहान मुलांनी नाकात पेन्सल, पेन किंवा एखादी वस्तू घातल्याने दुखापत झाल्यास, जखमा, अँलर्जी, जंतूसंसर्ग, उच्च रक्तदाब, रक्तात होणाऱ्या गुठळ्यांच्या तक्रारी ही नाकातून रक्त येण्याची काही कारणे आहेत. त्यामुळे जर भविष्यात कधी नाकातून रक्त आलं तर घाबरण्याचं कारण नाही.

Web Title: Health: This occurs due to summer blood from the nose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.