Health : अशा प्रकारच्या लोकांनी करु नये उपवास, होईल नुकसान !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 08:41 AM2017-07-19T08:41:44+5:302017-07-19T14:11:44+5:30
एका संशोधनानुसार उपवास करण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानही सांगण्यात आले आहे.
Next
ब ुतेक धार्मिक चित्रपट आणि मालिकांमध्ये उपवासाचे महत्त्व सांगण्यात येते. त्यानुसार आपण पालनही करतो. मात्र एका संशोधनानुसार उपवास करण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानही सांगण्यात आले आहे. काही दिवसांनी श्रावण महिना सुरु होत असून यादरम्यान बहुतांश लोक उपवास करत असतात.
काही ठराविक आजारांनी त्रस्त असणाऱ्या लोकांना डॉक्टर उपवास न करण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया कोणी उपवास अजिबात करू नये.
* ब्रेस्ट फिडींग करणाऱ्या महिलांनीही उपवास करू नये. यामुळे मुलांना आवश्यक ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
* डायबिटीजच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणे, औषध घेणे गरजेचे असते. अशात त्यांनी जर उपवास करून शरिराला यातना दिल्यात तर त्याना त्याचा मोठा फटका बसू शकतो.
* प्रेग्नेंट महिलांना सतत व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर या दरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने महिला आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
* हाय बिपीच्या पेशन्टनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.
* नुकतीच ज्या पेशन्टची सर्जरी झाली आहे त्यांनीही उपवास करू नये. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्सची गरज असते.
* ज्या लोकांमध्ये रक्ताची कमतरता आहे, त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरिरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.
* हार्टच्या पेशन्टना खाण्या-पिण्यावर जास्त लक्ष द्यावं लागतं. जर ते जास्त वेळ उपाशी राहिले तर त्यांच्या शरिराचं सिस्टम बिघडू शकतं.
* ज्या लोकांना लंग्समध्ये काही त्रास असेल तर त्यांनीही उपवास करू नये. याने त्रास अधिक वाढू शकतो.
source : india.com