Health : 'या' फायद्यांमुळे फुटबॉल खेळ खेळावा !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 12:49 PM2017-09-09T12:49:52+5:302017-09-09T18:19:52+5:30

हा खेळ खेळल्याने हाडांबरोबरच मांसपेशीही मजबूत होतात, ज्यामुळे आपले शरीर फिट आणि फाइन होण्यास मदत होई ल. यासाठी फुटबॉल खेळ आवर्जून खेळा.

Health: Play football games with these 'benefits'! | Health : 'या' फायद्यांमुळे फुटबॉल खेळ खेळावा !

Health : 'या' फायद्यांमुळे फुटबॉल खेळ खेळावा !

googlenewsNext
दानी खेळ कुठलाही असो त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातच फुटबॉल खेळ आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे एका संशोधनात आढळले आहे. विशेषत: बऱ्याच बॉलिवूड चित्रपटात फुटबॉलचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. तर काही चित्रपटांचा आशयही फुटबॉल खेळावर आधारित आहे. त्यात ‘सिकंदर’, ‘कभी अलविदा ना कहेना’, ‘हिप हिप हुर्रे’, ‘गोल’ आदी चित्रपटांचे नाव आवर्जून घेता येईल.

संशोधनानुसार आठवड्यात तीन तास फुटबॉल खेळल्याने हाडे मजबूत व स्वस्थ राहतात. फुटबॉल खेळणाऱ्यांची हाडे पोहणारे किंवा सायकलिंग करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक मजबूत असतात. फुटबॉल खेळणे एक उत्तम प्रभाव असलेला व तीव्र व्यायाम आहे.

एक्झेटर विद्यापीठातील संशोधक दिमित्रिस लाचोपोलस यांनी सांगितले की, ‘आमच्या संशोधनानुसार फुटबॉल खेळल्याने हाडांच्या विकासात पोहणारे किंवा सायकलिंग करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक सुधार जाणवला.’

लाचोपोलस यांनी सांगितले, ‘जरी हे संशोधन आठवड्यात किमान नऊ तासापेक्षा अधिक फुटबॉल खेळणाऱ्यांवर केंद्रित असले तरी आठवड्यात तीन तास फुटबॉल खेळल्यानेही पुरेसा प्रभाव पडू शकतो.’ 

पोहणे व सायकलिंग यामध्ये भार देऊन अभ्यास करावा लागत नसल्यामुळे हाडांच्या विकासासाठी हे प्रकार फारसे परिणामकारक नाहीत. यासोबत भार द्यावा लागणाऱ्या व्यायामाचा समावेश केल्यास हे हाडांच्या विकासासाठी उपयोगी ठरेल.

बालवयात जर फुटबॉल खेळ खेळला तर सुरुवातीपासून हाडे मजबूत होतील आणि भविष्यात हाडांच्या समस्या उद्भवणार नाहीत. शिवाय हा खेळ खेळल्याने हाडांबरोबरच मांसपेशीही मजबूत होतात, ज्यामुळे आपले शरीर फिट आणि फाइन होण्यास मदत होई ल. यासाठी फुटबॉल खेळ आवर्जून खेळा.  

Web Title: Health: Play football games with these 'benefits'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.