उशीशिवाय झोपुन तर पाहा, इतके आरोग्यदायी फायदे की उशी वापरणं विसरून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:11 AM2021-09-05T11:11:14+5:302021-09-05T13:33:02+5:30
जर तुम्ही पाठदुखी, मानदुखी या समस्यांनी त्रस्त असाल तर सर्वप्रथम उशी घेऊन झोपण्याची सवय सोडा. उशी न घेेतल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
उशी घेऊन झोपणे कितीही आरामदायक वाटत असलं तरी त्यामुळे मान आणि पाठदुखीच्या तक्रारी होऊ शकतात. कारण उशी घेऊन झोपल्यामुळे शरीराची स्थिती बिघडते. जर तुम्हीही पाठदुखी, मानदुखी या समस्यांनी त्रस्त असाल तर सर्वप्रथम उशी घेऊन झोपण्याची सवय सोडा. उशी न घेेतल्यास काय फायदे मिळतात हे जाणून घेऊ.
पाठ दुखणार नाही
उशी घेऊन झोपल्याने कंबरेची पोझिशन बिघडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पाठदुखी सुरू होते. उशीशिवाय झोपल्यास मान आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत राहतो. ज्यामुळे पाठदुखी होत नाही.
मान दुखणार नाही
उशी घेऊन झोपल्याने मानेला आधार मिळत नाही. अशाप्रकारच्या चुकीच्या झोपेच्या स्थितीमुळे मान जड झाल्यासारखी वाटते आणि वेदना होतात.
अॅलर्जी होत नाही
ज्या लोकांना धुळीची अॅलर्जी आहे. त्यांनी उशा वापरुच नयेत कारण उशीवरील धूळ, घाण झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासाद्वारे शरीराच्या आत पोहोचते आणि विविध समस्या निर्माण होतात.
मुरुमांपासून मुक्ती
उशीचा वापर चेहऱ्यावर सतत होणाऱ्या मुरुमांमागील एक कारण असू शकते. अनेक वेळा आपण बेडशीट आणि उशीचे कव्हर जास्त काळ बदलत नाही.त्यामुळे धूळ, माती तसेच घाम, लाळ उशीवर तशीच राहते आणि ती चेहऱ्यावर जमते. त्यामुळे त्वचेवर मुरुम, पुरळ, सूज आणि लालसरपणा येतो.
डोकेदुखीपासून आराम
उशी घेऊन झोपल्यामुळे सकाळी उठल्यानंतर डोके जड वाटते कारण मान व्यवस्थित न राहिल्याने मेंदुला रक्त पुरवठा नीट होत नाही. तसेच मेंदुतील ब्लड सर्क्युलेशनवरही त्याचा परिणाम होतो, त्यामुळे काही दिवस उशीशिवाय झोपा आणि मग फरक पाहा.