Health : ​फक्त १० रुपयाचा ‘हा’ उपाय, लाखो रुपयांपेक्षाही आहे परिणामकारक !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 01:00 PM2017-08-29T13:00:36+5:302017-08-29T18:30:36+5:30

लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा असा काही सोपा उपाय आहे त्याद्वारे आपण घरच्याघरी पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया त्या उपायाबाबत...

Health: 'This' remedy of only 10 rupees is effective than millions of rupees! | Health : ​फक्त १० रुपयाचा ‘हा’ उपाय, लाखो रुपयांपेक्षाही आहे परिणामकारक !

Health : ​फक्त १० रुपयाचा ‘हा’ उपाय, लाखो रुपयांपेक्षाही आहे परिणामकारक !

Next
णही सेलिब्रिटींसारखे फिट दिसावे असे प्रत्येक तरुणाला वाटते. त्यासाठी बहुतांश तरुण जिममध्ये जाऊन मेहनतही घेतात. बरेच तरुण तर आपले शरीर पिळदार बनविण्यासाठी लाखो रुपयेही खर्च करतात. मात्र लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा असा काही सोपा उपाय आहे त्याद्वारे आपण घरच्याघरी पिळदार शरीर मिळवू शकता. चला जाणून घेऊया त्या उपायाबाबत...



भाजलेले चणे खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते मात्र त्यासोबत गुळ सेवन केल्यास शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. बरेच पुरुष बॉडी बनविण्यासाठी आणि मसल्स बनविण्यासाठी जिममध्ये मेहनत घेतात. मात्र अशावेळी चणा आणि गुळचे सेवन करणेही आवश्यक आहे.

चणा आणि गुळामध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन असते जे मसल्स मजबूत बनण्यास फायदेशीर ठरते. यासाठी प्रत्येक पुरुषाने याचे सेवन अवश्य करावे. यात झिंकचेही प्रमाण आढळते जे त्वचेची चकाकी वाढण्यास मदत करते. याच्या सेवनाने मसल्स तर बनतीलच शिवाय चेहऱ्यावरची चमकही वाढते. गुळ आणि चणा एकत्र सेवन केल्याने शरीराचा मेटॅबॉलिज्मदेखील वाढतो ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. वजन कमी करण्यासाठी आपण कसरत करीत असाल तर गुळ आणि चण्याचे सेवन केल्यास अधिक फायदा मिळेल. 

शरीराची पचनक्रिया खराब झाल्यास अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. गुळ आणि चणामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होऊन वरील समस्या दूर होतात. गुळ आणि चणा एकत्र सेवन केल्यास मेंदूला विटॅमिन ‘बी’ भरपूर प्रमाणात मिळते ज्यामुळे मेंदू अ‍ॅक्टिव्ह होतो शिवाय यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास आणि मेंदूच्या नसांना मजबूतीही मिळते. 

Web Title: Health: 'This' remedy of only 10 rupees is effective than millions of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.