HEALTH RESEARCH : रोज दहीचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 09:37 AM2017-05-16T09:37:38+5:302017-05-16T15:07:38+5:30

दुग्धजन्य पदार्थ आणि हाडांचा कमकुवतपणा याबद्दलचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे.

HEALTH RESEARCH: If you consume daily yogurt, help strengthen bones! | HEALTH RESEARCH : रोज दहीचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत !

HEALTH RESEARCH : रोज दहीचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत !

Next
ा नव्या अभ्यासात रोज दहीचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होऊन हाडांच्या आरोग्यातही सुधारणा होत असल्याचे आढळले आहे. दह्यामध्ये हाडांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये असतात, ज्यामुळे हाडांचा ठिसूळ होण्यापासून बचाव होतो. दुग्धजन्य पदार्थ आणि हाडांचा कमकुवतपणा याबद्दलचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संशोधन आहे. त्यानुसार, आहारामध्ये दह्याचे प्रमाण वाढवल्यामुळे हाडांची घनता वाढते. तसेच त्यामुळे वृद्ध महिला आणि पुरुषांमधील हाडे ठिसूळ होण्याचे (आॅस्टिओपोरोसिस) प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.
संशोधकांनी अभ्यासात सहभागी झालेल्या १ हजार ५७ महिला आणि ७६३ पुरुषांना एक प्रश्नावली दिली होती. यामध्ये जे लोक आठवड्यातून दोन-तीन वेळा, दररोज आणि कधीही दही न खाणाºयांची यादी करण्यात आली. तसेच यामध्ये इतर दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, धूम्रपान, मद्यपान करणे आणि इतर हाडांच्या आरोग्याला प्रभावित करणाऱ्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. शरीरातील कॅल्शियम अथवा जीवनसत्त्व ‘ड’ची मात्रा कमी झाल्यामुळे हाडांची झीज होण्यास सुरुवात होते. ती कमी होऊ नये, यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत. दही घेण्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा धोका ५२ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांना आढळून आले.

Also Read : ​ब्लड प्रेशरवर दहीचा उपाय

Web Title: HEALTH RESEARCH: If you consume daily yogurt, help strengthen bones!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.