DJ च्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आवाज...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 05:51 PM2024-10-22T17:51:54+5:302024-10-22T17:53:03+5:30

Health Risks of Loud Music : काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे 13 वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Health Risks of Loud Music : Can the sound of a DJ cause a heart attack? Know how dangerous this sound is | DJ च्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आवाज...

DJ च्या तीव्र आवाजामुळे हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आवाज...

Health Risks of Loud Music : लग्न, मिरवणूक, पब किंवा इतर अनेक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात DJ लावला जातो. या कर्कष आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, अलीकडेच मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका 13 वर्षीय मुलाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, याआधीही देशाच्या विविध भागात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या आवाजात गाणी किंवा संगीत ऐकल्याने हृदयविकाराचा झटका येतो का? मोठा आवाज आरोग्यासाठी किती घातक आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

डीजेचा मोठा आवाज किती धोकादायक आहे?
WHOच्या माहितीनुसार, मोठ्या आवाजातील संगीत किंवा कुठल्याही मोठ्या आवाजामुळे 12 ते 35 वर्षे वयोगटातील सुमारे 100 कोटी लोकांना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका आहे. मोठ्या आवाजामुळे आरोग्याची अनेक हानी होऊ शकते. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, निर्धारित मर्यादेपेक्षा डेसिबल पातळी वाढल्यास केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. 

मोठ्या आवाजामुळे कोणते रोग धोकादायक आहेत?
बहिरेपणा
मानसिक ताण
चिडचिड
तीव्र डोकेदुखी
उच्च रक्तदाब
निद्रानाश
स्मरणशक्ती कमी होणे
मेंदूतील रक्तस्त्राव
कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही
हृदयविकाराचा धोका

डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा धोका आहे का?
आपल्या कानांचा हृदयाशी थेट संबंध असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. म्हणजे जो काही आवाज कानापर्यंत पोहोचतो, तो नसांद्वारे हृदयापर्यंतही पोहोचतो. जेव्हा डीजेचा आवाज सतत कानाच्या पडद्यावर पडतो, तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. कानाच्या नसांमध्ये रक्त घट्ट होऊ शकते आणि हे जास्त काळ चालू राहिल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अमेरिकेच्या न्यू जर्सी मेडिक्सच्या अहवालानुसार, अतिशय गोंगाट असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका सर्वाधिक असतो. उदाहरणार्थ, विमानतळ परिसरात हृदयविकाराचा धोका 72% वाढतो. लहान मुले, वृद्ध लोक किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना मोठ्या आवाजाचा धोका असतो.

किती आवाज आरोग्यासाठी धोकादायक आहे?
ध्वनीची तीव्रता डेसिबल (DB) मध्ये मोजली जाते. हिअरिंग हेल्थ फाउंडेशनच्या मते, 70 डेसिबल किंवा त्यापेक्षा कमी आवाज सुरक्षित आहे. यापेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात राहणे धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते, आजकाल वापरल्या जाणाऱ्या संगीत उपकरणे, इअरफोन्स आणि इअरबड्सचा आवाज 60% व्हॉल्यूम पातळीवर 75-80 डेसिबल आहे, तर पूर्ण आवाजात हा 110० डेसिबलपर्यंत पोहोचतो. एखाद्याला दररोज 8 तासांपेक्षा जास्त काळ 85 डेसिबलपेक्षा जास्त आवाज येत असेल, तर त्याची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

Web Title: Health Risks of Loud Music : Can the sound of a DJ cause a heart attack? Know how dangerous this sound is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.