Health : ...म्हणून विना मेडिकल चेकअप जॉईन करू नये जिम !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 11:57 AM2017-07-12T11:57:18+5:302017-07-12T17:27:18+5:30
जिम जॉईन करण्याचा विचार करीत असाल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला अत्यावश्यक आहे.
जिममध्ये व्यायाम करताना १७ वर्षीय अजिंक्य पांडूरंग लोळगे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पालघरमध्येही ३० वर्षीय जेनिडा कार्व्हालो या तरुणीचा व्यायाम करताना मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूचे कारणही एकच आहे, ते म्हणजे ह्रदयावर अतिदाब वाढल्याने मृत्यू होणे. बऱ्याचदा आपण फक्त सेलेब्रिटींचे अनुकरण करून रात्रंदिवस बॉडी बनविण्यासाठी जिममध्ये मेहनत घेतो. मात्र कदाचित आपणास माहित नसेल प्रत्येक सेलेब्स जिम जॉईन करण्याअगोदर संपूर्ण बाडी चेकअप करतात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच जिम जॉइन करतात.
यावरून आपणही जिम जॉईन करण्याचा विचार करीत असाल किंवा जिम जॉईन केली असेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्ला अत्यावश्यक आहे.
* व्यायाम करताना काय काळजी घ्याल
-जिम जॉईन करण्याअगोदर डॉक्टारांकडून एकदा शरीराची तपासणी करुन घ्या.
-प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय जिममध्ये कोणताही व्यायाम प्रकार करू नका.
-एका दिवसात शरीर फुगवणे किंवा कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच्या शारीरिक क्षमतेप्रमाणेच व्यायाम करा.
-व्यायाम करताना वॉर्मअप जसा महत्वाचा आहे, तसेच शरीराला कुल डाऊन करणेही महत्वाचे आहे.
-पहिल्याच दिवशी खूप व्यायाम करणे धोकादायक आहे. व्यायाम हा टप्प्या टप्प्याने वाढवत जायचा असतो.
-तुमच्या व्यायामप्रमाणे तुमच्या आहाराचेही नियोजन करा.
-शरीराला विश्रांतीची फार गरज असते, त्यामुळे आठवड्यातील १ दिवस व्यायामापासून सुट्टी घ्या.
-आरोग्य हिच धनसंपदा आहे, त्यामुळे त्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
Also Read : Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !
: Health : जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !