Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 08:59 AM2017-06-14T08:59:32+5:302017-06-14T15:16:44+5:30
प्रेग्नन्सीनंतर वाढलेले वजन तिने काही महिन्यातच कमी केले, जाणून घ्या...
Next
करिना कपूर खानने तीन महिन्यापूर्वीच तैमूरला जन्म दिला. मात्र तीनच महिन्यात करिना अगोदरसारखी स्लिम दिसायला लागली. एवढेच नव्हे तर प्रेग्नन्सीनंतर तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य जास्तच खुलले. करिनाने आपल्या प्रेग्नन्सीदरम्यान सुमारे १८ किलो वजन वाढविले होते. मात्र वाढलेले वजन तिने प्रेग्नन्सीनंतर काही महिन्यातच कमी केले. यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एवढ्या लवकर वजन कमी केल्याबद्दल तिची प्रशंसा होत आहे.
विशेष म्हणजे तिने वजन कसे कमी केले हे जाणून घेण्यासाठी बरेजचण उत्सुकही आहेत. चला जाणून घेऊया करिनाने आपले वजन कसे कमी केले ते.
करिना नेहमी आपल्या फिटनेसच्या बाबतीत उत्साही आहे, आणि आता एक मुलगा झाल्यानंतर ती आपले आरोग्य आणि फिटनेसवर कधी तडजोड नाही करु इच्छित. ती वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी जिम आणि योगाच्या माध्यमाने खूपच मेहनत घेताना दिसत आहे. करिना आणि तिची बीबीएफ अमृता अरोडादेखील तिच्या सोबत जिममध्ये मेहनत करीत आहे. या दोघांची चांगली मैत्री आहे. अमृताने तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात करिना जिममध्ये घाम गाळताना दिसत असून ती फिटनेससाठी एवढी मेहनत घेत आहे हे पाहून आपल्याला विश्वासच बसणार नाही.
करिनाने फिट राहण्यासाठी आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले आहे. करिना रोज एक मोठा ग्लास दूध घेते. कारण प्रेग्नन्सी अगोदर आणि प्रेग्नन्सीनंतर शरीरातील कॅल्शियम कमी होते, त्याची कमतरता फक्त दुधच भरुन काढू शकते, शिवाय तिचे असे म्हणणे आहे की, एक ग्लास दूध घेतल्याने अगोदरच्या साइजमध्ये येत आहे. शिवाय ती रोज ८ ते १० ग्लास कोमट पाणी पिते. प्रेग्नन्सी अगोदर आणि नंतर पाण्याची आवश्यकता असते. म्हणून ती फिट राहण्यासाठी पाणी भरपूर पिते. करिना योगा बऱ्याच वर्षापासून करत आहे. योगामुळे मन, शरीर आणि आरोग्य संतुलित राहण्यास मदत होते. करिना आपल्या शरीराची लवचिकता टिकविण्यासाठी वॉर्म अप, पॉवर योग, सूर्य नमस्कार आणि श्वासासंबंधीत व्यायामदेखील करते. शिवाय हिरवा भाजीपाल्याला जास्त पसंत करते, कारण करिना शुद्ध शाकाहारी आहे. वजन कमी करण्यासाठी पनीर, रोटी, पराठा, सोया दूध, दाळ, सलाद आणि सूप आदींचा आहारात ती आवर्जून समावेश करते.
ती नास्त्यामध्ये प्रोटीन शेक किंवा फळ खात असते. यामुळे तिला ऊर्जा मिळते आणि वजनदेखील कमी होते. याच बरोबर ती कार्डियादेखील करते. यामुळे तिला प्रेग्नन्सीनंतर फिट राहण्यास मदत मिळते. प्रेग्नन्सीनंतर लगेचच व्यायाम केला जाऊ शकत नाही म्हणून सर्वप्रथम तिने वॉक सुरु केला होता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पाहा व्हिडिओ...