HEALTH : घसा दुखतोय? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 12:58 PM2017-03-31T12:58:15+5:302017-03-31T18:28:15+5:30

घसा खराब होण्याची समस्या बहुतांश हवामानाच्या बदलामुळे निर्माण होते. बऱ्याचदा यामुळे खाताना त्रास होणे, तसेच कणकणदेखील जाणवते. यासाठी घसा खराब झाल्यास काय करू शकता याबाबत जाणून घेऊया.

HEALTH: Sore throat? 'This' home remedies will be rested! | HEALTH : घसा दुखतोय? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम !

HEALTH : घसा दुखतोय? ‘या’ घरगुती उपायाने मिळेल आराम !

Next
ा खराब होण्याची समस्या बहुतांश हवामानाच्या बदलामुळे निर्माण होते. व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन अथवा घशाला काही इजा झाल्यास घशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. बऱ्याचदा यामुळे खाताना त्रास होणे, तसेच कणकणदेखील जाणवते. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर काही घरगुती उपायांनी घशाला आराम पडू शकतो. यासाठी घसा खराब झाल्यास काय करू शकता याबाबत जाणून घेऊया.
घसा खराब झाल्यास अनेकजण लसणाच्या पाकळीचेदेखील सेवन करतात. कच्च्या लसणामध्ये एंटिबॅक्टेरिया आणि एंटिसेप्टिक गुण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जे घशासाठी फायदेशीर ठरू शकतात. याचबरोबर आलंयुक्त चहा, तुळशीची पाने, तुळशीचा काढा किंवा चिकन सूपचे सेवन करू शकता. यामुळे विनाऔषध तुम्हाला आराम मिळू शकतो. काहीजण घरगुती उपायांबरोबरच औषध घेणे देखील पसंत करतात. 
गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे हा यावरचा उत्तम उपाय ठरू शकतो, यात थोडीशी हळद टाकल्यास घशाला लवकर आराम पडण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर मधाचे सेवनदेखील यावरील चांगला उपाय ठरू शकतो. खवखवणऱ्या घशावर मधाचे सेवन थेट परिणाम करण्यास मदत करू शकते. घशाला त्रास जाणवत असल्यास ‘सी’ जीवनसत्वाची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
श्वसन प्रणालीतील वरच्या नळीला संसर्ग झाल्यासदेखील घशाचा त्रास जाणवतो. लॅबमधील टेस्टद्वारेच याचे निदान होऊ शकते. गरज नसताना अँटिबायोटिक्सचे सेवन हानिकारक ठरू शकते. अधिक त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधाचे सेवन करावे. 

Web Title: HEALTH: Sore throat? 'This' home remedies will be rested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.