HEALTH : परीक्षेदरम्यान येणाऱ्या तणावापासून असे राहा दूर !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 12:29 PM2017-02-28T12:29:54+5:302017-02-28T17:59:54+5:30
परीक्षेदरम्यानचा जास्त तणाव हा स्मृतिभ्रंमास कारणीभूत ठरु शकतो. याचा परिणाम आपल्या विचार आणि निर्णयक्षमतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Next
सध्या सर्वत्र परीक्षेचे वातावरण असून परीक्षेदरम्यान प्रत्येकाला ताण-तणाव येतोच. अधिकच्या ताण-तणावाचा परिणाम परीक्षेवर होतो आणि त्यामुळे गुणवत्ता ढासळली जाते. विशेष म्हणजे, परीक्षेदरम्यानचा जास्त तणाव हा स्मृतिभ्रंमास कारणीभूत ठरु शकतो. याचा परिणाम आपल्या विचार आणि निर्णयक्षमतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत, ज्या आपणास परीक्षेदरम्यान तणावमुक्त ठेवण्यास मदत करतील.
* स्रॅक्स ब्रेक
परीक्षेची तयारी करताना वेळ कमी पडतो. मात्र याचा अर्थ असा नाही की, आपण अभ्यासादरम्यान ब्रेक घेऊ नये. या दरम्यान ब्रेक घेऊन त्यावेळी बादाम, के ळी आदी हेल्दी खाद्यपदार्थ खा. यामुळे आपला मेंदू तेज राहण्यास मदत होईल.
* पाळीव प्राण्यासोबत खेळा
तज्ज्ञांच्या मते, पाळीव प्राण्यासोबत खेळल्याने तणाव लवकर कमी होतो हे निष्पन्न झाले आहे. अभ्यासादरम्यान जर थकवा जाणवत असेल तर थोडा वेळ काढून नक्की खेळा.
* काही कॉमेडी प्रोग्राम पाहा
हसल्याने तणावमुक्त होण्यास मदत होते. अभ्यासादरम्यान मरगड आल्यास काही वेळ काढून कॉमेडी प्रोग्राम पाहिल्यास तणाव दूर होण्यास मदत होते.
* फोन बंद ठेवा
अभ्यासादरम्यान आपला फोन चारहात लांबच ठेवा. यामुळे आपला तणाव काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. कारण यादरम्यान वेळोवेळी आपल्या मित्रांचा किंवा अन्य कुणाचा कॉल किंवा संदेश आल्यास आपल्या तणावात भर पडते. यासाठी अभ्यासादरम्यान फोन बंदच ठेवावा.