HEALTH : ​उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 12:28 PM2017-03-17T12:28:35+5:302017-03-17T18:09:22+5:30

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते, मात्र उन्हाळ्याचा त्वचेवर परिणाम होतो.

HEALTH: Take care of the skin in the summer! | HEALTH : ​उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी !

HEALTH : ​उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी !

Next
ong>-Ravindra More
उन्हाळ्याची चाहुल लागली असून कडक उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच आपल्या सौंदर्याबाबत जागृत असायला हवे. विशेषत: उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. कारण त्वचेची पोत कशी आहे, यावरच आपले सौंदर्य ठरत असते. आजच्या सदरता उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.

* ओठांच्या सुरक्षिततेसाठी 
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने उन्हाळ्यात हिवाळ्यापेक्षा ओठ अधिक कोरडे पडतात. यासाठी एसपीएफ जास्त असलेले लिप बाम वापरा. यामुळे तुमचे ओठ कोरडे राहणार नाहीत. 

* डोक्यावर मोठी टोपी 
सूर्यकिरणांपासून चेहऱ्याच्या त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी प्रवास करताना किंवा बाहेर फिरताना डोक्यावर मोठी टोपी आवश्यक आहे. यामुळे सूर्यकिरणांपासून संरक्षण तर होईल शिवाय तुम्ही स्टायलिशही दिसाल. 

* मॉईश्चरायझर
जास्त एसपीएफ असलेले मॉईश्चरायझर दिवसभर लावून राहा. शिवाय आपल्या बॅगमध्ये जास्त एसपीएफ असलेले कॉम्पॅक्ट पावडर ठेवा. मॉईश्चरायझर लावल्यानंतर लावायला कॉम्पॅक्ट कामी येईल. 

* वारंवार पाणी प्या
उन्हाळ्यात खूप घाम येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. यासाठी शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी वारंवार पाणी प्या. सोबत ज्यूस, लिंबूपाणी किंवा पाण्याची बॉटल बाळगणे अधिक चांगले. 

* हाताच्या त्वचेची काळजी घ्या
बाहेर फिरताना किंवा दुचाकी वाहन चालविताना आपल्या हाताच्या त्वचेवर सूर्यकिरणांचा संपर्क आल्याने हातावरची त्वचा काळवंटते. शिवाय नकळत आपले हात टॅन होतात. यासाठी वरचेवर हातांना हॅन्ड क्रीम लावा. 

* सनग्लासचा वापर करा
उन्हाळ्यात सूर्यकिरणांचा डोळ्यांवरही परिणाम होत असतो. यासाठी डोळ्यांना ग्लेअर्स, गॉगल्स, शेड, रिफ्लेक्टर्स आणि एव्हिएटर्सची गरज भासते. म्हणून आपले सनग्लासेस सतत जवळ ठेवा. 

Web Title: HEALTH: Take care of the skin in the summer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.