HEALTH: रोज एक कप कॉफी घ्या अन् आयुष्यमान वाढवा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 06:10 PM2017-01-20T18:10:50+5:302017-01-20T18:10:50+5:30

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज एक कप कॉफी घेतल्याने आयुष्यमान वाढते असे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी कॉफी, हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजार आणि वाढते वय यासंबंधी हे संशोधन जाहीर केले आहे. ​

HEALTH: Take a cup of coffee every day and increase your life! | HEALTH: रोज एक कप कॉफी घ्या अन् आयुष्यमान वाढवा !

HEALTH: रोज एक कप कॉफी घ्या अन् आयुष्यमान वाढवा !

Next
प्रत्येक भारतीयाला चहा, कॉफी पिण्याची सवय आहे. जास्त प्रमाणात चहा, कॉफी घेतल्यास आरोग्यासाठी घातक आहे असे बऱ्याचदा सांगितले जाते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज एक कप कॉफी घेतल्याने आयुष्यमान वाढते असे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी कॉफी, हृदय व रक्तवाहिन्यांसंदर्भातील आजार आणि वाढते वय यासंबंधी हे संशोधन जाहीर केले आहे.



वयोवृद्ध लोकांमध्ये हृदयाला पुरवठा करणाऱ्या काही धमन्यांची पोकळी कमी होऊन नुकसानकारक प्रक्रिया घडते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमधील पोकळी कमी होत गेल्यामुळे कर्करोग, अल्झायमर आणि इतरही आजारांना निमंत्रण मिळत असल्याने मृत्यूचा धोका मोठा प्रमाणात वाढतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले. मात्र, कॉफी घेतल्याने त्यातील कॅफेनयुक्त पदाथार्मुळे ही प्रक्रिया रोखण्याबरोबरच हृदय व रक्तवाहिन्यांवरील अतिरिक्त दाब टाळता येणे शक्य आहे. त्यामुळेच कॉफी घेणे फायदेशीर ठरते. 

या अभ्यासात रक्ताचे नमुने, सर्वेक्षणातील माहिती, वैद्यकीय आणि कौटुंबिक माहिती या माध्यमातून सहभागी झालेल्या शेकडो जणांची तपासणी करण्यात आली. यातील अनेकांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होते. चयापचय, शरीरात बिघाड करणारे पदार्थ, न्यूक्लिअस अ‍ॅसिड यांमुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि हृदयविकाराला चालना मिळते. मात्र, या सगळ्यावर कॉफी हा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे. त्याचप्रमाणे कॉफीमुळे आयुष्यमानात कशी वाढ होऊ शकते हेदेखील संशोधकांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: HEALTH: Take a cup of coffee every day and increase your life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.