Health : धुम्रपान सोडताना सामना करावी लागणारी आव्हाने, जाणून घ्या काय उपाय केल्यास होईल जास्त फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:38 PM2022-04-19T18:38:17+5:302022-04-19T18:39:08+5:30
challenges of quitting smoking : धूम्रपानामुळे कर्करोग, हदयविषयक आजार आणि क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) असे गंभीर आजार होतात आणि जगभरात अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो.
लेखक: श्रीम. रतनदीप चावला, वरिष्ठ समुपदेशक व प्रशिक्षक; आणि श्रीम. ग्रीष्मा शाह, वरिष्ठ समुपदेशक
जागतिक आरोग्य संघटनेने सादर केलेल्या डेटानुसार दरवर्षी धूम्रपान किंवा तंबाखू सेवनामुळे ८ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू होतो, प्रत्यक्ष वापरामुळे ७ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू होतो, तर सेकंड हँड स्मोकमुळे जवळपास १.२ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू होतो. डेटामधून निदर्शनास येते की, सिगारेट ओढणे हा प्रतिबंधात्मक मृत्यू व आजारांसाठी प्रमुख कारणीभूत घटक आहे. धूम्रपानामुळे कर्करोग, हदयविषयक आजार आणि क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) असे गंभीर आजार होतात आणि जगभरात अनेक व्यक्तींचा मृत्यू होतो.
धूम्रपान सोडणे हे कोणत्याही धूम्रपान करणा-या व्यक्तीसाठी अवघड असू शकते, पण अशा व्यसनांवर आळा घालण्यासाठी बरेच मार्ग आहेत. तसेच अनेक सरकारी व स्वयंसेवी संस्थांकडून विविध तंबाखू बंदी उपक्रम राबवले जातात.
धूम्रपान सोडण्यामधील सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे धूम्रपानामुळे होणा-या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे. निकोटिन संदर्भातील लक्षणे व्यक्ती ते व्यक्ती वेगळी असू शकतात. काही सामान्य लक्षणे आहेत तीव्र इच्छा, उदासपणा आणि खिन्नतेची भावना, चिडचिड व उदास राहणे, एकाग्र होण्यास त्रास होणे, अस्वस्थता, ह्दयस्पंदन वेग कमी होणे आणि उपासमारीची भावना वाढणे. धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणारे जवळपास प्रत्येकजण लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण चांगली बाब म्हणजे असे ते अधिक काळ करत नाही. तज्ञांच्या मते लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण ३ ते ४ आठवड्यांपर्यंत राहते. पण अतीव इच्छा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा अधिक काळ राहू शकते.
कधी-कधी तीव्र इच्छा कोणत्याही चेतावणी चिन्हांशिवाय निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीला धूम्रपान सोडणे अवघड जाते. विविध सर्वेक्षणांमधून निदर्शनास येते की, इतर व्यक्तींना धूम्रपान करताना पाहणे किंवा सिगारेट ओढत असल्याचा वास येणे अशा धूम्रपानासंदर्भात रिमाइंडर्समुळे तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. हे रिमांइडर्स धोकादायक असतात. म्हणून अशा प्रकारच्या धोक्यांची हाताळणी करण्यासाठी योग्य नियोजन व मार्ग असणे आवश्यक आहे.
तीव्र इच्छेवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वत:ला व्यस्त ठेवणे किंवा कोणतेही शारीरिक काम हाती घेणे. कामांमध्ये व्यस्त राहिल्याने तीव्र इच्छेवर प्रतिबंध राहण्यासोबत धोके देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. तज्ञांच्या मते सर्वोत्तम मार्ग म्हणजे मनाला गुंतवून ठेवणे आणि व्यत्यय टाळणे.
कधी-कधी मूड देखील धोकादायक ठरतो, उदाहरणार्थ व्यक्तींना दु:खी असताना किंवा राग आल्यावर किंवा मन दुखावले असताना धूम्रपान करावेसे वाटते. तसेच पूर्वीच्या धूम्रपानाशी संबंधित नित्यक्रम देखील धोकादायक ठरू शकतात. जसे की, ड्रायव्हिंग करताना किंवा ब्रेकदरम्यान धूम्रपान करण्याची सवय असलेल्या व्यक्तींना याच कृती करताना तीव्र इच्छा होऊ शकते.
व्यक्तींना धूम्रपान सोडण्यास आव्हानात्मक जाणारी आणखी कारणे म्हणजे सहकारी मित्रांचा दबाव, नेहमीच्या सवयी जसे जेवणानंतर किंवा उठल्यानंतर धूम्रपान करणे आणि शेवटचे पण महत्त्वाचे म्हणजे सामाजिक अपेक्षा.
धूम्रपान सोडण्यासंदर्भात कोणतीही विशिष्ट वेळ नसली तरी असे म्हटले जाते की ही, सवय मोडण्यासाठी जवळपास ६६ दिवस लागतात. अनेक उपक्रम देखील आहेत, जे व्यक्तींना धूम्रपान सोडण्यामध्ये मदत करतात, उदाहरणार्थ - निकोटिन रिप्लेसमेंट थेरपी व मोडॅलिटीज. निकोटिन पॅचेस्, लोझेंजेस किंवा गम्स यांसारख्या विविध प्रकारच्या गोष्टी आहेत, ज्या निकोटिनचा स्रोत म्हणून धूम्रपानाऐवजी वापरता येऊ शकतात. कधी-कधी डॉक्टर्स देखील धूम्रपान सोडण्यासाठी नसल थेरपी किंवा इनहेलर्स सारख्या प्रीस्क्रीप्शन निकोटिनचा सल्ला देतात.
इतरांचा पाठिंबा असल्यास धूम्रपान सोडण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होते. याच कारणामुळे व्यक्ती सपोर्ट ग्रुप्समध्ये सामील होतात आणि धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणा-या इतर व्यक्तींसोबत संवाद साधण्याचा व विचारांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करतात. क्विट लाइन पर्याय देखील उपलब्ध आहे, जेथे योग्य व्यक्तीशी कनेक्ट होण्याकरिता टोल फ्री क्रमांक दिला जातो आणि ती व्यक्ती या प्रक्रियेमध्ये योग्य मार्गदर्शन करेल. सपोर्ट ग्रुप नसेल तर व्यक्ती कुटुंबामधील सदस्य किंवा जिवलग मित्रांकडून पाठिंबा मिळवू शकते. पाठिंबा देणा-या व्यक्तीसमोर खुल्या मनाने विचार व्यक्त करणे आणि स्वत:च्या प्रगतीबाबत प्रामाणिकपणे सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला नेहमीच कोणीतरी दखल घेत असल्यासारखे वाटेल आणि धूम्रपान सोडण्याच्या वचनाचे पालन करणे ही तुमची जबाबदारी आहे.
धूम्रपान सोडणे अत्यंत अवघड बाब वाटू शकते, काही व्यक्तींना असे करताना नैराश्यामधून जात असल्यासारखे वाटू शकते, पण ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्ही कितीही लक्षणांकडे दुर्लक्ष केले तरी धूम्रपान सोडणे ही नेहमीच चांगली बाब आहे.