HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2017 10:03 AM2017-04-20T10:03:20+5:302017-04-20T17:53:38+5:30

स्तनांजवळ गाठी जाणवणं हा फक्त ब्रेस्ट कॅन्सरचा धोका नसून तशाच प्रकारच्या इरतही गंभीर समस्या असू शकतात.

HEALTH: There are 5 serious problems without breast cancer, this is annoying for breast! | HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !

HEALTH : ब्रेस्ट कॅन्सरशिवाय ‘या’ ५ गंभीर समस्या आहेत ‘ब्रेस्ट’साठी त्रासदायक !

googlenewsNext
ong>-Ravindra More 
बहुतेक महिला आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. त्यातील स्तन हा असाच दुलर्क्षित अवयव आहे, ज्यांची महिला फारशी काळजी घेत नाहीत. बऱ्याचजणांना स्तनात गाठ जावणवताच ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असल्याचा मनात समज निर्माण करुन धावाधाव करतात. मात्र स्तनांजवळ गाठी जाणवणं हा फक्त ब्रेस्ट कॅन्सरचा धोका नसून तशाच प्रकारच्या इरतही गंभीर समस्या असू शकतात. 



* ब्रेस्ट इंफेक्शन 
योग्य प्रकारे स्तनपान न करता येणं, घामाच्या ग्रंथींमध्ये गुठळ्या होणं,  इन्ग्रोव्हन केसांची समस्या यामुळे तुमच्या स्तानाला इंफेक्शन होते. सोबतच सूज, लालसरपणा, इंफेक्शन, स्तना जवळून पस, रक्त, लाल किंवा हिरवट स्त्राव बाहेर पडणं अशी लक्षणं दिसून येतात. 



* निपल्समधून रक्त बाहेर पडणे
 स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, निपल्समधून रक्त बाहेर पडत असल्यास हे नॉन कॅन्सरस ट्युमरचं लक्षण समजावे. या समस्येला स्रंस्र्र’’ङ्में (पॅपिल्लोमा) म्हणतात. या समस्येत मिल्क डक्टची वाढ झपाट्याने होत असते. अशावेळी त्वरित डॉक्टरांची मदत घ्या. एखाद्या स्तनामधून रक्त बाहेर पडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.



* स्तनपानकरतेवेळी त्रास होणे
स्तनांमध्ये पुरेशा दूधाची निर्मिती न होणं तसेच बाळाला स्तनपान करताना त्रास होणं अशा समस्या वाढत असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. स्तनांमध्ये सूज आल्याने ते अधिक जाडसर बनतात आणि खूप भरलेले असतात. तसेच त्यांना स्पर्श केल्यानंतर वेदना जाणवतात.



* क्रिस्ट 
क्रिस्ट खूप वेदनादायी असतात. फ्लूईडयुक्त गाठी असल्या तरीही त्या कॅन्सरच्या नसतात. मासिकपाळीच्या काळात या वेदनादायी, जाडसर होतात. काही वेळेस दोन्ही स्तानांमध्ये अशाप्रकारचे वेदना जाणवतात.



* टॅटूमुळे होणारे नुकसान 
 टॅटूची इंक चांगल्या प्रतीची नसल्यास त्यामुळे शरीरात टॉक्सिक घटक वाढू शकतात. परिणामी स्कीन कॅन्सरचा धोका वाढतो. इ.छ.ङ. ऌङ्म२स्र३्रं’ चे कन्सल्टंट प्लॅस्टिक सर्जन डॉ. डी.जे एस तुला यांच्या सल्ल्यानुसार, टॅटूसाठी वापरली जाणारी साधनं उत्तम असणं गरजेचे आहे. त्यामध्ये दुषित रक्त मिसळलेले असेल तर एड्स, हेपिटायटीस बी आणि सी चा धोका वाढतो.

Also Read : ​HEALTH : स्तनाच्या कॅन्सरवर मधुमेहाचे औषध उपयुक्त !
                                 ​ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी औषध विकसित!

Web Title: HEALTH: There are 5 serious problems without breast cancer, this is annoying for breast!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.