HEALTH : आपणासही पाय हलविण्याची सवय आहे का? असू शकतो हा आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 09:47 AM2017-03-29T09:47:05+5:302017-03-29T15:17:05+5:30

बऱ्याच लोकांना बसल्या-बसल्या पाय हलविण्याची सवय असते ज्याला ते सहजतेने घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. चला जाणून घेऊया की, पाय हलविण्याचे काय काय कारण आहेत.

HEALTH: Is there a habit of moving your feet? It can be a disease! | HEALTH : आपणासही पाय हलविण्याची सवय आहे का? असू शकतो हा आजार !

HEALTH : आपणासही पाय हलविण्याची सवय आहे का? असू शकतो हा आजार !

Next

/>बऱ्याच लोकांना बसल्या-बसल्या पाय हलविण्याची सवय असते ज्याला ते सहजतेने घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते. चला जाणून घेऊया की, पाय हलविण्याचे काय काय कारण आहेत. 

* जेव्हा शरीरात लोहाची कमतरता जाणवते तेव्हा पाय आपोआपच हलतात. यासाठी आपल्या डायटमध्ये अशा वस्तूंचा समावेश असावा ज्यात भरपूर प्रमाणात लोह असेल. 

* कित्येकदा आपण पाहिले असेल की, आपण अंथरूणावर लोटले असेल किंवा बसलो असेल तेव्हा पाय आपोआपच हलायला लागतात. असे रेस्टलेस सिंड्रॉमच्या कारणाने होऊ शकते. यात पायांचे हलणे, त्यात सुई टोचण्यासारखे वाटणे, खाज येणे आदी लक्षणे जाणवतात. 

* यूएस देशात तर या समस्येने सुमारे दहा टक्के नागरीक या समस्येने त्रस्त आहेत. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते मात्र जास्त तरुणांमध्ये दिसते. 

* कधी कधी गरोदर महिलांनाही शेवटच्या तीन महिन्यांमध्ये या समस्येमधून जावे लागते. मात्र डिलेव्हरीच्या एका महिन्यानंतर या समस्येपासून सुटका मिळते. 

* रेस्टलेस सिंड्रॉम नर्वस सिस्टमशी संबंधीत आहे आणि पाय हलविल्याने डोपामाइन हार्मोन निघतो, आणि या हार्माेनच्या कारणानेच एक काम पुन्हा पुन्हा करण्याची ईच्छा जागृत होते. रेस्टलेस सिंड्रॉमला स्लीप डिसआॅर्डरदेखील म्हटले जाते.  

Web Title: HEALTH: Is there a habit of moving your feet? It can be a disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.