Health : ​परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत ५ घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2017 11:04 AM2017-07-01T11:04:53+5:302017-07-01T16:34:53+5:30

काही घरगुती उपाय आहेत जे फॉलो केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होईल आणि आपणास परफेक्ट फिगर मिळेल.

Health: These are '5' household measures for perfect figure! | Health : ​परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत ५ घरगुती उपाय !

Health : ​परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत ५ घरगुती उपाय !

googlenewsNext
लिवूड असो की, हॉलिवूड येथील सेलिब्रिटींची फिगर ही परफेक्ट असते. त्यासाठी त्या व्यायामाबरोबरच डायटकडे आवर्जून लक्ष देतात. आपली फिगरही सेलिब्रिटींसारखी हवी असे आज प्रत्येक तरुणी किंवा महिलेस वाटते. मात्र वाढत्या वजनाने आपला लूक तर खराब दिसतो शिवाय मनाप्रमाणे आपण आवडता ड्रेसही परिधान करू शकत नाही. ही समस्या आपणासही भेडसावत असेल तर काही घरगुती उपाय आहेत जे फॉलो केल्यास नैसर्गिक रित्या आपले वजन कमी होईल आणि आपणास परफेक्ट फिगर मिळेल.  

* एक ग्लास पाण्यात अद्रक आणि लिंबूच्या स्लाइस टाकून काही वेळासाठी मंद आचेवर गरम करा. त्यानंतर पाण्याला गाळून प्या. पाणी पिताना ते कोमटच हवे. असे केल्याने लठ्ठपणासोबतच ओवरइटिंगची समस्यादेखील कमी होते. 

* वजन कमी करण्यासाठी आणि परफेक्ट फिगरसाठी ग्रीन टीदेखील मदत करते. यासाठी नियमित ग्रीन टीचे सेवन करू शकता. 

* आहारात जास्त मिठाचा वापर करु नका. यामुळे वजन वाढते. 

* परफेक्ट फिगरसाठी आहारात तांदूळ आणि बटाट्याचा समावेश नको. जर तांदूळ खाण्याची इच्छाच असेल तर तांदूळला कुकर ऐवजी परसट भांड्यात शिजवा आणि अतिरिक्त पाणी काढून फेकून द्या.  

* वजन नियंत्रणात राहावे आणि फिगर परफेक्ट असावी यासाठी कोशिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पत्ताकोबी कापून मिक्स करा. त्यानंतर कोशिंबीराचे सेवन करा. यामुळे आपले शरीर स्लिम होण्यास मदत होते. पत्ताकोबी सहज पचते, सोबतच बºयाच वेळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे जेवण कमी जाते आणि वजन नियंत्रणात राहते.    

Web Title: Health: These are '5' household measures for perfect figure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.