HEALTH : ‘या’ कारणांनी तरुणपणात येतो हार्ट अटॅक !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 06:54 AM2017-08-01T06:54:25+5:302017-08-01T12:24:25+5:30
कमी वयात येणाऱ्या हार्ट अटॅकपासून आपणही वाचू शकतो, जाणून घ्या कारणे आणि उपाय !
Next
बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा जवळचा मित्र इंदर कुमारचे २८ जुलै रोजी हार्ट अटॅकमुळे निधन झाले. जरी इंदर कुमार मोठा स्टार नव्हता, पण अवघ्या वयाच्या ४४ व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू होणे ही गोष्ट अख्ख्या बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त करण्यासारखी आहे.
संपूर्ण जगात हार्ट अटॅकचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु भारतात ही स्थिती जास्त गंभीर आहे. विशेषत: येथे अवघ्या ३० ते ४० वर्षांच्या लोकांनाही हार्ट अटॅक येतो. काही तज्ज्ञांच्या मते, आपल्या भागात हार्ट अटॅक येण्याचे वय १० वर्षांनी कमी झाले आहे. म्हणजे कमी वयातच हार्ट अटॅक येत आहे.
* कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कारणे
एका संशोधनानुसार आशिया खंडात राहणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. मात्र याचे कारण नेमके काय हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञ म्हणतात की, बदलत्या लाइफस्टाइलमुळे यंगस्टर्समध्ये हार्टचे आजार वाढत आहेत. विशेषत: भारतात खराब लाइफस्टाइलमुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकच्या शक्यता वाढत आहेत.
* अनुवांशिक-
जर घरात हा त्रास एखाद्या सदस्याला असेल तर हार्ट अटॅकचा धोका आपणासही होऊ शकतो.
* फळ आणि भाजीपाल्यांचे कमी सेवन करणे-
धावपळीच्या जगण्यामध्ये आपले ऋतूमानानुसार फळांचे आणि हिरव्या भाजीपाल्याचे सेवन करण्याकडे दुर्लक्ष होते आणि फास्ट फुड सेवन केले जाते. याचा परिणाम ह्रदयावर होतो आणि धोका वाढतो.
* व्यायामाचा अभाव-
वेळे अभावी किंवा इतर कारणाने आपण व्यायामापासून चार हात लांब राहतो. यामुळे हार्ट अटॅक सारख्या समस्या निर्माण होतात.
* अतिरिक्त चरबी वाढणे-
व्यायामाचा अभाव शिवाय अतिरिक्त फास्ट फुडचे सेवन यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढते आणि त्यासोबतच हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
* उच्च रक्तदाब किंवा मधुमेह-
बऱ्याचजणांना रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्या असतात. वेळीच लक्ष न दिल्याने या समस्या रुद्र रुप धारण करतात आणि हार्ट अटॅकला आमंत्रण देतात.
* धुम्रपान / मद्यपान-
बहुतांश लोकांना धुम्रपान किंवा मद्यपान करण्याची सवय असते. ही सवय ह्रदयासाठी अत्यंत घातक असून यामुळेही हार्ट अटॅक येऊ शकतो.
* हार्ट अटॅक टाळण्यासाठी काय कराल?
- आपल्या रोजच्या रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश असावा. रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करावा.
- कामानिमित्त किंवा इतर कारणांनी घराबाहेर पळत असाल तर बाहेरचे तळलेले कोणतेही पदार्थ सेवन करु नका.
- हार्ट अटॅकला कारणीभूत ठरणारे धुम्रपान आणि मद्यपान त्वरित अव्हॉइड करा. शिवाय जंक फूड देखील खाणे टाळा .
- बऱ्याचदा आपण पैसे कमविण्यासाठी एवढे व्यस्त होतो की, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून वयाच्या ३० वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीने रुटीन चेकअप करणे गरजेचे आहे. यामुळे एखाद्या समस्येचे सुरुवातीलाच निदान होऊन त्वरित उपचार होऊ शकतो आणि भविष्यातील धोका टळू शकतो.
Also Read : इंदर कुमारचे हार्ट अटॅकने झाले निधन, अटॅक आल्यानंतर कसे कराल बचाव !