Health : पोटाची चरबी कमी न होण्याची ही आहेत कारणे !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 11:13 AM2017-06-08T11:13:15+5:302017-06-08T16:43:15+5:30

पोटाची चरबी वाढण्याची अशी काही कारणे आहेत, ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी पोटाची चरबी कमी होत नाही.

Health: These are the reasons for the absence of belly fat! | Health : पोटाची चरबी कमी न होण्याची ही आहेत कारणे !

Health : पोटाची चरबी कमी न होण्याची ही आहेत कारणे !

googlenewsNext
ेकजणांची पोटाची चरबी वाढलेली आहे. ती कमी करण्यासाठी रोज वेगवेगळे उपायही केले जातात, त्यात व्यायाम करणे शिवाय जेवण कमी करणे असे प्रयोग प्रामुख्याने केले जातात, मात्र पदरी निराशाच पडते. पोटावर चरबी गोळा होणे वाढणाऱ्या वजनापेक्षा जास्त घातक आहे. पोटाची चरबीमुळे हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे असंतुलन व श्वसनाचे विकार अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, पोटाची चरबी वाढण्याची अशी काही कारणे आहेत, ज्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी पोटाची चरबी कमी होत नाही. 

* काय कराल उपाय
* उशीरा जेवण
जेवणानंतर लगेच झोपल्याने वजन वाढते. झोपताना शरीरातील फॅट पूर्णपणे बर्न होत नाही. त्यामुळे पोटाची चरबी वाढण्यास मदत होते. 

* वेळेवर नाश्ता करणे 
दिवसाची सुरूवात पोटभर नाश्त्याने करा. नाश्ता न केल्याने पचन प्रक्रिया कमी होते. यामुळे कमी कॅलरी बर्न होतात. 

* मद्यपान
जास्त मद्यपान केल्यामुळे पोटाच्या अवतीभोवती चरबी गोळा होते. जास्त मद्यपान केल्याने भूक वाढते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवायला लागता. 

Also Read : ​HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !
                    HEALTH : ​पोट सुटलयं, दालचिनीयुक्त चहा प्या !

Web Title: Health: These are the reasons for the absence of belly fat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.