Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2017 12:19 PM2017-07-07T12:19:20+5:302017-07-07T17:49:20+5:30

काही लोक तर वर्षानुवर्ष जिममध्ये जातात, मात्र मनाप्रमाणे बॉडी शेप मिळवू शकले नाही. जाणून घ्या काय आहेत कारणे !

Health: 'These' mistakes do not go to the gym even after the perfect figure! | Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !

Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
सेलिब्रिटी आवश्यक चित्रपटाच्या भूमिकेनुसार बॉडी शेप मिळविण्यासाठी जिमचा आधार घेतात. विशेष म्हणजे काही दिवसातच त्यांना आवश्यक तसे ते आपल्या बॉडीमध्ये बदल करु शकतात. याचे विशेष गुपित म्हणजे जिममध्ये जाण्याचे योग्य नियम ते फॉलो करतात. मात्र आपण पाहिले असेल की, जिममध्ये जाऊनही बऱ्याच लोकांच्या शरीरात आवश्यक बदल दिसत नाही, म्हणजेच त्यांना अपेक्षित परफेक्ट फिगर मिळत नाही. काही लोक तर वर्षानुवर्ष जिममध्ये जातात, मात्र मनाप्रमाणे बॉडी शेप मिळवू शकले नाही. 
 
जिममध्ये जाऊनही परफेक्ट बॉडी शेप न बनण्याचे अनेक कारणे आहेत. त्यात बऱ्याच लोकांचा डायट प्लॅन अयोग्य असतो किंवा काही लोकांच्या शरीरात असे काही हार्माेनल बदल घडतात ज्यामुळे त्यांची बॉडी कधी फिट दिसत नाही.  
जर आपणही जिम जात असाल आणि अपेक्षित बॉडी बनत नसेल तर आपण कदाचित काही तरी चुक करीत असाल. आज आम्ही आपणास परफेक्ट बॉडी शेप मिळण्यासाठी जिम बरोबरच अजून कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष असावे, याबाबत काही गोष्टी सांगत आहोत.  

* वर्क आउटचे नियोजन 
कधीही विना नियोजन असेच जिममध्ये जाऊ नका. संपूर्ण आठवड्याचे एक-एक दिवसाचे नियोजन करा आणि त्यानुसार एक्सरसाइज करा. बऱ्याचदा आपण फक्त कार्डियो एक्सरसाइजच करतात आणि दुसऱ्या एक्सरसाइजवर लक्ष देत नाही.या लहान चुकीमुळे आपण कधी परफेक्ट बॉडी शेप मिळवू शकत नाही. 

* जिममध्ये गप्पा नको 
बरेच लोक जिममध्ये जाऊन जास्त वेळ मित्रांशी गप्पा आणि चर्चा करण्यामध्ये वाया घालवितात. आपण तिथे गप्पा करायला नव्हे तर बॉडी बनविण्यासाठी जातात हे विसरु नका. यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. 

* तज्ज्ञांचा सल्ला घ्या
कधीही जिममध्ये स्वत: काही नवीन करण्याचा प्रयत्न करू नका. जिम ट्रेनरशी मनमोकळे चर्चा करा आणि त्यांचा योग्य सल्ला घ्या. आपल्या चुकीच्या निर्णयाने आपणास इजा होऊ शकते. कदाचित आपल्या मनाप्रमाणे निवडलेली एक्सरसाइज आपणास बरोबर वाटत असेल मात्र आपणासाठी ती गरजेची नसेल. यासाठी आपल्या ट्रेनरशी मनमोकळे बोला आणि त्यांचा सल्ला घ्या.  

* हेल्दी डाइट 
परफेक्ट बॉडीसाठी फक्त रोजच जिम जाणे गरजेचे नाही. त्यासोबतच आपणास हेल्दी डायटदेखील घ्यावा लागतो. जर दोन तास जिम गेल्यानंतर आपण बाहेर हाय कॅलरीयुक्त जंक फूड आणि शूगरयुक्त काही खाद्यपदार्थ सेवन करत असाल तर समजा जिम जाऊन काहीच फायदा नाही. यासाठी फक्त हेल्दीच पदार्थ सेवन करावेत. 

Also Read : ​Health Alert : ​‘या’ गंभिर समस्यांच्या भीतीने सेलिब्रिटी सोडत नाहीत अर्ध्यावर जिम !
                    : Health : ​जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !

Web Title: Health: 'These' mistakes do not go to the gym even after the perfect figure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.